IPL 2024 Auction News : आयपीएल लिलावाची उड्डाणे १०० कोटींपार? ; बीसीसीआय-संघ मालकांच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

आयपीएलमध्ये आता आठऐवजी दहा संघांमध्ये अजिंक्यपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएलचा विस्तार आता आणखीन वाढणार आहे. संघ मालकांकडे आता लिलावाप्रसंगी १०० कोटींहून अधिक रक्कम असण्याची शक्यता आहे. तसेच एका संघामध्ये चारपेक्षा जास्त खेळाडू कायम ठेवण्याचा नियमही करण्यात येऊ शकणार आहे.
IPL 2024 Auction News
IPL 2024 Auction Newssakal
Updated on

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आता आठऐवजी दहा संघांमध्ये अजिंक्यपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. आयपीएलचा विस्तार आता आणखीन वाढणार आहे. संघ मालकांकडे आता लिलावाप्रसंगी १०० कोटींहून अधिक रक्कम असण्याची शक्यता आहे. तसेच एका संघामध्ये चारपेक्षा जास्त खेळाडू कायम ठेवण्याचा नियमही करण्यात येऊ शकणार आहे. बीसीसीआयकडून येत्या १६ एप्रिल रोजी आयपीएलमध्ये सहभागी संघांच्या मालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयकडून आयोजित करण्यात येत असलेल्या या बैठकीत सचिव जय शहा, अध्यक्ष रॉजर बिन्नी व आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांची उपस्थिती असणार आहे. आयपीएलचा यंदाचा मोसम सुरू झाला असून एप्रिलपर्यंत स्पर्धेचा दुसरा महिना सुरू होणार आहे. त्यामुळे ही एक साधी बैठक असेल असे म्हटले जात असले तरी यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

रामनवमीमुळे कोलकातामधील सामना दुसरीकडे?

कोलकाता-राजस्थान यांच्यामधील सामना येत्या १७ एप्रिल रोजी ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र रामनवमीमुळे ही लढत आता इतर दिवशी होण्याची शक्यता आहे. बंगाल क्रिकेट संघटनेकडून बीसीसीआयकडे अशाप्रकारची विनंती करण्यात आली आहे. बंगाल क्रिकेट संघटनेकडून १६ एप्रिल किंवा १८ एप्रिल या तारखांना ही लढत खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, १९ एप्रिल रोजी बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा असणार आहे. सामना इतरत्र खेळवल्यास बाकीच्या बाबींवरही फरक पडणार, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले

IPL 2024 Auction News
IPL 2024 MI vs RR : रोहित शर्मा बाद होताच सर्वत्र पसरला सन्नाटा

खेळाडूंची संख्या ठरवणार

काही संघ मालकांकडून रिटेन्शन अर्थातच खेळाडूंची संघात कायम ठेवण्याची संख्या वाढवून हवी आहे. सध्या चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम आहे. काही संघ मालक आठ खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी करीत आहेत. तसेच राईट टू मॅच कार्ड या नियमाची सुरुवात पुन्हा करायला हवी, असे काहींचे मत आहे. एखादा खेळाडू आपल्या संघात असून त्याला कायम ठेवता आले नाही. तर मग असे खेळाडू लिलालात राईट टू मॅच कार्डद्वारे आपल्याकडे कायम ठेवता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.