हैदराबाद - लोक काय टीका करतात याला मी महत्त्व देत नाही, तसेच अगोदरच्या सामन्यात काय झाले याचाही विचार करत नाही, असे मत हैदराबादविरुद्ध अफलातून शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीने व्यक्त केले. विराटच्या या खेळीमुळे बंगळूरचे यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले-ऑफचे स्थान जवळपास निश्चित झाले.
माझ्याकडून धावा होत नसल्याबद्दल आणि स्ट्राईक रेट कमी होत असल्याबद्दल बाहेरून बरेच काही बोलले जात होते, पण मी त्याची पर्वा करत नाही. असे विराट म्हणाला. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात विराटने ६३ चेंडूंत १०० धावांची खेळी साकार केली. यातील त्याचे फटके थक्क करणारे होते. एक षटकार तर १०३ मीटर इतका लांब गेला.
अगोदरच्या सामन्यात आपण किती धावा केल्या याचा विचार करून मी स्वतःवरचे दडपण वाढवत नाही, तसेच अशा अफलातून खेळी केल्यानंतरही त्याचे श्रेय मी स्वतःला देत नाही. त्याचप्रमाणे लोक काय म्हणतात यालाही मी महत्त्व देत नाही, अशी स्पष्ट भावना विराटने सामन्यानंतर व्यक्त केली.
तो पुढे म्हणतो, जेव्हा तुमच्यावर अशी परिस्थिती येत असते तेव्हा तुम्ही स्वतःला नव्हे तर खेळाला मोठे करायचे असते आणि असे मी वारंवार करत आलो आहे. अशा खेळी करतो तेव्हा माझा संघ जिंकत असतो, मी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत असतो, असे विराटने सांगितले.
कसोटी अंतिम सामना लक्षात आहेकाही तरी आगळे वेगळे आणि विचित्र फटके मारणारा मी फलंदाज नाही. आम्ही वर्षाचे बाराही महिने खेळत असतो. त्यामुळे विचित्र फटके मारून विकेट बहाल करणे माझ्या वृत्तीत बसत नाही. आयपीएलनंतर कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे, याचीही जाणीव मला आहे.
त्यामुळे या आयपीएलमध्ये मी तंत्रशुद्ध असेच फटके मारत आहे. तंत्रामध्ये कोठेही बदल केलेला नाही, असे विराटने आवर्जून सांगितले. या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले.या जबरदस्त शतकी खेळीत विराटने कर्णधार फाफ डुप्लेसीसह १७२ धावांची सलामी दिली.
डुप्लेसीच्या खेळीबाबत विचारले असता विराट हसत-हसत म्हणाला, ‘‘आमच्या दोघांमध्ये हातावर भरपूर टॅटू आहेत, तसेच ज्याप्रमाणे मी आणि एबी डिव्हिल्यर्स एकत्रितपणे फलंदाजी करायचो तशी माझी आणि डुप्लेसीची जोडी जमली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.