IPL 2022 Final : तीन वर्षानंतर 'सांगता' समारंभ, खास तर असणारच भाऊ

IPL Final Closing Ceremony Before Gujarat Titans Rajasthan Royals Final
IPL Final Closing Ceremony Before Gujarat Titans Rajasthan Royals Final ESAKAL
Updated on

अहमदाबाद : आयपीएलमधील नवखा संघ गुजरात टायटन्स आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलची फायनल खेळणार आहे. रविवारी (29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरूद्ध तो भिडणार आहे. गुजरात आपल्या होम ग्राऊंडवर तब्बल 1 लाख 30 प्रेक्षकांच्या समोर आपली पहिली वहिली आयपीएल फायनल खेळेल. दरम्यान, आयपीएलचा सामना सुरू होण्यापूर्वी एक शानदार निरोपाचा समारंभ (IPL Final Closing Ceremony) होणार आहे. 2019 मध्ये कोरोना साथरोगाने उच्छाद मांडल्यामुळे आयपीएलच्या उद्धाटन आणि समारोपाच्या जंगी कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता बीसीसीआयने 2022 च्या आयपीएल हंगामाची दणक्यात सांगता करण्याचे ठरवले. यासाठी बीसीसीआयने टेंडर काढले होते.

IPL Final Closing Ceremony Before Gujarat Titans Rajasthan Royals Final
SPN vs VEL : सिमनच्या हातून बॅट अन् सामना दोन्ही निसटला

विशेष म्हणजे यंदाचा आयपीएलचा सांगता समारंभ हा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर आधारलेला असणार आहे. केंद्र सरकार देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह, ए.आर. रेहमान, उर्वशी रौतेला देखील परफॉर्म करण्याची शक्यता आहे. आमिर खान देखील आपल्या नव्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहे. (IPL Final Closing Ceremony Before Gujarat Titans Rajasthan Royals Final)

IPL Final Closing Ceremony Before Gujarat Titans Rajasthan Royals Final
आजवर हार्दिक एकही IPL फायनल हरला नाही, मुंबईप्रमाणे गुजरात लकी ठरेल?

गुजरात आणि राजस्थान यांच्यात होणाऱ्या फायनलसाठी बीसीसीआयचे उच्च अधिकारी मैदानात उपस्थित असतील. यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शहा, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची उपस्थिती असणार आहे. याचबरोबर अहमदाबादमध्ये होणाऱ्या या समारंभासाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्याचे मोठे नेते देखील उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.