IPL Mega Auction 2022 : 599 खेळाडूंवर लागणार बोली

IPL Mega Auction 2022 Full auction list
IPL Mega Auction 2022 Full auction list Sakal
Updated on

IPL Mega Auction 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी दोन दिवसीय मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. 10 संघ या लिलावात खेळाडूंची खरेदी करुन संघ बांधणी करतील. बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा लिलावात एकूण 590 खेळाडू सहभागी होणार आहेत. यात 228 कॅप्ड प्लेयर्स, 355 अनकॅप्ड प्लेयर्स आणि 7 असोसिएट नेशनच्या प्लेयर्सचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेटमधील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) शिखर धवन (Shikhar Dhawan), आर अश्विन (R Ashwin), मोहम्मद शमी (Mohammad Shami) ईशान किशन (Ishan Kishan), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), सुरेश रैना (Suresh Raina), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), दीपक चाहर (Deepak Chahar), ईशांत शर्मा (Ishant Sharma), उमेश यादव (Umesh Yadav) या खेळाडूंचा समावेश आहे.

IPL Mega Auction 2022 Full auction list
IPL 2022 Auction : 'दस का दम' लिलावात या गोलंदाजांचा दिसेल बोलबाला!

परदेशी खेळाडूंमध्ये फाफ ड्युप्लेसीस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्रावो, शाकिब अल हसन आणि वानिडू हसरंगा या स्टार क्रिकेटर्सचा समावेश आहे. 2 कोटींच्या रेंजमध्ये 48 खेळाडूंचा समावेश आहे. 20 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी इतकी असून 34 खेळाडू 1 कोटीच्या मूळ किंमतीसह लिलावात उपलब्ध असतील.

कोणत्या देशाचे किती खेळाडू

आयपीएलच्या लिलावासाठी जी नावे फायनल झाली आहेत त्यात परदेशातील खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला दिसतो. त्यांचे एकूण 47 खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. त्याच्या पाठोपाठ वेस्ट इंडीज 34 आणि दक्षिण आफ्रिका 33, न्यूझीलंड आणि इंग्लंड 24, श्रीलंका 23 आणि अफगाणिस्तानच्या 17 खेळाडूंचा समावेश आहे.

  • अफगाणिस्तान - 17

  • ऑस्ट्रेलिया -47

  • बांगलादेश- 5

  • इंग्लंड- 24

  • आयर्लंड- 5

  • न्यूझीलंड- 24

  • दक्षिण आफ्रिका- 33

  • श्रीलंका- 23

  • वेस्ट इंडीज 34

  • झिम्बाब्वे 1

  • नामिबिया- 3

  • नेपाळ- 1

  • स्कॉटलंड- 2

  • अमेरिका- 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.