IPL news 2023 : दोनशेच्या स्ट्राईक रेटने फलंदाजीचे लक्ष्य

कॉनवे : धोनीच्या दोन झेलांमुळे विजय
Devon Conway
Devon Conwayesaka
Updated on

बंगळूर : फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर किमान दोनशे धावांच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करायची हे धोरण आम्ही आखले आहे आणि त्याचा फायदा आम्ही बंगळूरविरुद्धच्या सामन्यात झाला, असे चेन्नई संघाचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने सांगितले.

चेन्नईने आठ धावांनी जिंकलेल्या या सामन्यात कॉनवेने १८४.४४ च्या स्ट्राईक रेटने ४५ चेंडूत निर्णायक ८३ धावांची खेळी केली. चेन्नईने २० षटकांत २२६ धावा केल्या आणि हा सामना आठ धावांनी जिंकला.

सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा अपवाद वगळता चेन्नईच्या पाच फलंदाजांनी दीडशेपेक्षा अधिक धावांच्या स्ट्राईक रेटने (चेंडूमागे धावांची सरासरी) धावा केल्या. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस पोषक होती. त्यामुळे प्रथम फलंदाजी मिळाल्यावर आम्ही मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते आणि त्यासाठी चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करायला लागणार, हे अपेक्षित होते. त्यानुसार आम्ही फलंदाजी केली, असे कॉनवेने सांगितले.

मला स्वतःला दोनशे धावांच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करता आली नसली, तरी इतरांनी माझ्यापेक्षा अधिक वेगात धावा केल्या. रहाणे, दुबे, रायडू आणि मोईन अली यांच्यामुळे आम्हाला अपेक्षित धावा करता आल्या असे कॉनवे म्हणाला.

आमच्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या मॅक्सवेल आणि डुप्लेसी यांचे हवेत उंच उडालेले झेल धोनीने सफाईदारपणे टिपले; तसेच त्यांना बाद करण्यासाठी केलेली व्यूहरचनाही तेवढीच मोलाची होती, असे शब्दात कॉनवेने कर्णधार धोनीचे कौतूक केले. धोनीसारखा दिग्गज यष्टिरक्षक असताना हवेत फार उंच उडालेले झेल सुटणार नाहीत, हा विश्वास असतो, असेही कॉनवे म्हणाला.

धोनीचा अपवाद वगळता आम्ही काही झेल सोडले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारूनही पराभवाची चिन्हे दिसत होती; परंतु कोणीही जाणीवपूर्वक झेल सोडत नसतो; परंतु दडपण आल्यावर सोपा झेलही हातातून सुटतो. आमच्या सुदैवाने सुटलेल्या झेलपैकी एकही झेल महागडा ठरला नाही. आमच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करून विजय साकारून दिला, असे कॉनवेने सांगितले.

आपल्या पाठीशी मोठी धावसंख्या असली, तरी बंगळूरचे फलंदाज आपल्याला दडपणाखाली टाकू शकतात. त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवे आणि संधी मिळतात. आपण त्यांच्यावर दडपण टाकायला हवे, असा सल्ला धोनीने आम्हाला क्षेत्ररक्षणास उतरताना दिला असल्याचे माहिती कॉनवेने दिली.

चेन्नईच्या पाच फलंदाजांच्या धावा आणि स्ट्राईक रेट

  • डेव्हन कॉनवे ः धावा ३७ ः (१८४.४४)

  • अजिंक्य रहाणे ः धावा ३७ ः (१८५)

  • शिवम दुबे ः धावा ५२ ः (१९२.५९)

  • अंबाती रायडू ः धावा ः १४ ः (२३३.३३)

  • मोईन अली ः धावा ः १९ ः (२११.११)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.