IPL news : रोहितने काही सामन्यांची विश्रांती घ्यावी ; सुनील गावसकर

माजी दिग्गज फलंदाज गावसकर यांचा मुंबईच्या कर्णधाराला सल्ला
Sunil Gavaskar Rohit Sharma IPL
Sunil Gavaskar Rohit Sharma IPLesakal
Updated on

नवी दिल्ली : टीम इंडियासह आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्माने आयपीएलमधून काही काळासाठी विश्रांती घ्यावी आणि अखेरच्या काही सामन्यात ताजेतवाने होऊन परतावे असा थेट सल्ला माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी दिला आहे.

गुजरात संघाकडून चारी मुंड्या चीत होऊन ५५ धावांच्या मानहानीकारक पराभवाचा सामना मुंबई इंडियन्सला मंगळवारच्या सामन्यात करावा लागला त्यानंतर बोलताना गावसकर यांनी मुंबई संघाच्या फलंदाजीत आता काही बदल अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

खर सांगायच तर रोहितने आता काही काळासाठी विश्रांती घेऊन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे. आयपीएलच्या अखेरच्या काही सामन्यांसाठी परत आला तरी हरकत नाही, परंतु आत्ता विश्रांती घेणे आवश्यक आहे, असे रोखठोक वक्तव्य गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात रोहित शरामा आठ चेंडू खेळल्यानंतर केवळ दोन धावा करून बाद झाला. चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नांत बॅटचा कडा घेतलेला चेंडू गोलंदाज हार्दिक पंड्याच्या हाती आरामात स्थिरावला. रोहितचा फॉर्म संघाच्या कामगिरीप्रमाणे वरखाली होत आहे. सलामीचा सामना गमावल्यानंतर सलग तीन विजय मिळवून मुंबई इंडियन्सने गाडी रुळावर आणली होती, परंतु त्यानंतर सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

रोहितला सात सामन्यात मिळून १३५.०७ च्या स्ट्राईक रेटने १८१ धावा करता आल्या आहेत तो वारंवार २० ते ४५ धावांच्या आत बाद होत आहे. दिल्ली संघाविरुद्ध केवळ त्याने ६५ धावा केल्या होत्या. हे एकमेव अर्धशतक त्याच्या नावावर आहे.

मुंबईचा अखेरचा साखळी सामना २१ मे रोजी

आयपीएलचा अंतिम सामना २८ मे रोजी होत आहे तर ७ जून पासून जागतिक कसोटी अंतिम सामना ओव्हल (लंडन) येथे सुरू होत आहे. मुंबईचा अखेरचा साखळी सामना २१ मे रोजी होत आहे. प्लेऑफ गाठता आली नाही तर मुंबई संघाचा हा अखेरचा सामना असेल आणि रोहितला तेव्हापासून विश्रांती मिळू शकेल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. रोहितने आत्तापासून या अंतिम सामन्याचा विचार करायला हवा आणि महत्वही द्यायला हवे. गतवेळच्या कसोटी अंजिंक्यपद अंतिम सामन्यात आपला न्यूझीलंडकडून पराभव झाला होता, हे सुद्धा विसरू नये, असे गावसकर म्हणतात.

रोहितच्या खेळावरून तो कसोटी अंतिम सामन्याचा विचार करत असल्याचे जाणवत आहे, याबाबत मी ठामपणे सांगू शकत नाही, परंतु आत्ता तरी त्याने विश्रांती घेऊन अखेरच्या तीन ते चार सामन्यांसाठी परतावे असे गावसकर यांचे म्हणणे आहे.

तीन सामन्यांची विश्रांती?

सध्याच्या स्थितीनुसार अर्धे (७) साखळी सामने झाले आहेत. सात सामने शिल्लक आहेत गावसर यांच्या म्हणण्यानुसार अखेरच्या तीन ते चार सामन्यांसाठी रोहितने परतावे असे गावसकर यांचा सुचवायचे असेल तर रोहतला तीन सामन्यांचीच विश्रांती घ्यावी लागेल.

रोहितवरचा वर्कलोड

या वर्षात आत्तापर्यंत रोहित शर्मा श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध प्रत्येकी तीन असे सलग सहा एकदिवसीय सामने खेळला आहे दोन आठवड्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चारही सामने खेळला पुढे एका एकदिवसीय सामन्याची विश्रांती घेतल्यानंतर तो पुढच्या दोन सामन्यांसाठी मैदानात उतरला होता.

मुंबई संघाचा पुढचा सामना येत्या रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणआर आहे. सात सामन्यानंतर सध्या ते सातव्या क्रमांकावर आहेत.

सध्याची स्थिती पहाता मुंबई इंडियन्सने येथून पुढे प्लेऑफला स्थान मिळवले तर तो चमत्कार असेल. पहिल्या चार संघात त्यांना स्थान मिळवायचे असेल तर त्यांना फलंदाजीसह गोलंदाजीतही असामान्य कामगिरी करावी लागणार आहे.

- सुनील गावसकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.