यशस्वी जैस्वालच्या षटकारने IPL मध्ये घडवला इतिहास

आयपीएलचा या 15 व्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा इतिहासात बनला आहे.
Most Number Of Sixes IPL 2022
Most Number Of Sixes IPL 2022
Updated on

IPL 2022: आयपीएल मध्ये चाहत्यांना भरपूर षटकार पाहिला मिळाले आहेत. आयपीएलचा या 15 व्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा इतिहासात बनला आहे. या हंगामापूर्वी एका स्पर्धेत 872 षटकार मारण्याचा विक्रम झाला होता, मात्र यावेळी हा आकडा ओलांडला आहे, तरी काही सामने आजून बाकी आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये, राजस्थान रॉयल्सने (RR) आयपीएलच्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 24 धावांनी पराभव केला. राजस्थानचा फलंदाज यशस्वी जैस्वालच्या एका षटकाराने एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम झाला आहे.(Most Number Of Sixes IPL 2022)

लखनौचा दुष्मंता चमिरा सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. त्या षटकात राजस्थानच्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने असा जबरदस्त षटकार मारला की चेंडू पुन्हा जमिनीवर आलाच नाही. चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. जैस्वालने 103 मीटरचा लांब षटकार ठोकला.

Most Number Of Sixes IPL 2022
रियान परागच्या 'त्या' कृतीवर चाहते हैराण; सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

आयपीएल 2022 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनच्या नावावर आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या चेंडूवर IPL 2022 मधील सर्वात लांब षटकार मारला होता. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने 117 मीटर षटकार मारला होता. यामागे मुंबई इंडियन्सच्या डेवाल्ड ब्रेविसने ही ११२ मीटरचा षटकार मारला आहे.

यशस्वी जैस्वालने कालच्या या सामन्यात 29 चेंडूत 41 धावा केल्या. या खेळी मध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत IPL 2022 मध्ये 6 सामन्यात 25.50 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालला 2020 मध्ये पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2021 मध्ये यांनी चागंली कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.