IPL 2022 : आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामातील डबल हेडरच्या लढतीनंतर पाँइंटस टेबल आणि ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीच्या यादीत उलथापालथ झालीये. शनिवारी दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात जोस बटलरच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील पहिले शतक आले. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला. तर संध्याकाळच्या सत्रातील लढतीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवला.
या दोन सामन्यांमुळे गुणतालिकेतील बदल झाला आहे. चारही संघांच्या क्रमवारीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. स्पर्धेत अपराजित असलेल्या राजस्थान संघाने 2 सामन्यातील विजयासह आपल्या खात्यात 4 गुण जमा केले असून ते अव्वलस्थानावर पोहचलाय. त्यांनी गत हंगामातील उप विजेता कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावार खेचले आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सनं पंतच्या दिल्लीला चौथ्या स्थानावर ढकलले आहे. हार्दिक पांड्याचा संघ एका स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. यंदाच्या हंगामात खराब सुरुवात झालेल्या मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सलग दोन पराभवामुळे नवव्या स्थानावर आहे.
ऑरेंज-पर्पल कॅप कुणाकडे?
आयपीएलच्या आतापर्यंतच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा युवा बॅटर इशान किशनने दमदार कामगिरी केलीये. मुंबई इंडियन्सने आपल्यासाठी विक्रमी बोली उगाच लावली नव्हती हे ते दाखवून देताना दिसत आहे. इशान किशनने दोन सामन्याती दोन अर्धशतकासह 135 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत त्याने राजस्थान रॉयल्सला मागे टाकून ऑरेंज कॅप पटकवलीये. जोस बटलरने एका शतकासह 135 धावा केल्या आहेत. पण सरासरी आणि स्ट्राइक रेट उत्तम असल्यामुळे ऑरेंज कॅपही इशानच्या डोक्यावर आहे. पर्पल कॅपवर केकेआरच्या उमेश यादवकडे आहे. त्याने स्पर्धेत 8 विकेट्स घेतल्या असून त्याच्या आजूबाजूलाही कुणी दिसत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.