IPL : उथप्पाला धमकी देऊन मुंबई इंडियन्समधून आरसीबीत केलं होतं ट्रान्सफर

Robin Uthappa Reveal Mumbai Indians Some One Bullied
Robin Uthappa Reveal Mumbai Indians Some One Bullied ESAKAL
Updated on

गेल्या दोन दिवसांपासून अनेक खेळाडू आयपीएलमधील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. युझवेंद्र चहलने मुंबई इंडियन्समध्ये असताना 2013 ला घडलेला प्रकार पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर केला. त्याआधी दोन दिवस रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) आर. अश्विन सोबत बोलताना 2009 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) असताना त्याला कशी धमकी मिळाली होती याचा खुलासा केला. त्यामुळे आयपीएलच्या जगतातील बुलिंग सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

Robin Uthappa Reveal Mumbai Indians Some One Bullied
IPL 2022 : सायमंड - फ्रँकलिनने चहलचे हात - पाय बांधले अन्...

रॉबिन उथप्पा हा सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याने मुंबई इंडियन्समध्ये असताना आलेल्या वाईट अनुभवाविषयी माहिती दिली. हा प्रसंग 2009 च्या हंगामात घडला होता. उथप्पाला संघातून ट्रन्सफर (Transferred) नको होती. त्यामुळे त्याने ट्रान्सफर पेपरवर हस्ताक्षर करण्यास टाळाटाळ केली होती. यावेळी त्याला मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने जवळपास धमकी दिली होती.

उथप्पा म्हणाला, 'मुंबई इंडियन्समधील एकाने मी त्याचे नाव घेऊ इच्छित नाही. मला सांगितले होते की, हे बघ तू जर ट्रान्सफर पेपरवर हस्ताक्षर केले नाहीस तर तुला मुंबई इंडियन्सच्या 11 च्या संघात खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे तू ट्रान्सफरवर हस्ताक्षर कर. अखेर मी ट्रान्सफर पेपरवर हस्ताक्षर केले.' उथप्पाने हे वक्तव्य आर. अश्विनच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

Robin Uthappa Reveal Mumbai Indians Some One Bullied
बेबी एबीची 'बेबी'; क्रिकेटशिवाय ब्रेविस गर्लफ्रेंडमुळंही चर्चेत

उथप्पा या मुलाखतीत वैयक्तिक समस्या आणि डिप्रेशनबाबत बोलत होता. तो म्हणाला की, 'मी आयपीएलमधला जहीर खान आणि मनिष पांडे बरोबरचा सर्वात सुरूवातीचा खेळाडू होतो ज्याची ट्रान्सफर होत होती. मी मुंबई इंडियन्सशी जोडला गेलो होतो. मला मुंबई इंडियन्स सोडायची नव्हती. हा सर्व प्रकार 2009 च्या आयपीएलपूर्वी एक महिना घडला.

रॉबिन उथप्पा म्हणाला, 'मी माझ्या काही वैयक्तिक समस्येतून देखील जात होतो. त्यामुळे मी थोडा भावनिक देखील होत होतो. मी आरसीबीत बावचळलेलाच होतो. मी त्या हंगामात एकही सामना खेळला नाही. मी त्या हंगामात फक्त मुंबई इंडियन्स विरूद्ध धावा केल्या होत्या. मी त्यावेळी विचार करत होतो की या सामन्यात मला काही तरी करायचं आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.