IPL 2025 मेगा लिलावापूर्वी चर्चांच्या बाजारात धुराळा; सूर्या, रोहित, पंत नंतर आता 'हा' कर्णधार सोडणार संघांची साथ?

आयपीएल 2025 पूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडू शकतो. 2024 च्या आयपीएलमध्ये रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.
IPL 2025
IPL 2025sakal
Updated on

यावेळी आयपीएलमधील खेळाडूंचा मोठा लिलाव होणार असून अनेक आयपीएल फ्रँचायझी नवीन कर्णधार बनवण्याच्या विचारात आहेत. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि या फॉरमॅटचा नवा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर नजर आहे.

रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

आयपीएल 2025 च्या आधी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता असे सांगण्यात येत आहे की मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी फ्रेंचायझी सोडू शकतो.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नीता अंबानीने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात रोहितचे कौतुक केल्यानंतर असे वाटत होते की मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार संघात राहील, परंतु भारतीय संघातील अलीकडच्या घडामोडींनी हे सर्व काही बदलून गेले आहे. याचा परिणाम केवळ मुंबई इंडियन्सच नाही तर अनेक फ्रँचायझींवर होईल. आता होणाऱ्या या मोठ्या लिलावासाठी मुंबई इंडियन्स कोणती रणनीती आखणार हे पाहायचे आहे. रोहितने रिटेन्शनसाठी रस दाखवला नाही तर मुंबई काय करणार?

IPL 2025
IND vs UAE : पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर आता कोणाची पाळी? जाणून घ्या टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाविरुद्ध अन् कधी

सूर्यकुमारचे काय होणार?

सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, हे पाऊल भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी उचलले असे मानले जात आहे. बीसीसीआयने गंभीरला प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याआधी रोहितचेही मत घेण्यात आले. रोहितने गंभीरच्या बाजूने मत दिले होते आणि त्याने मुख्य प्रशिक्षक बनताच हार्दिकच्या जागी सूर्यकुमारला टी-20 फॉरमॅटचा कर्णधार बनवण्याचे समर्थन केले.

यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहितला हटवून हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली होती, तेव्हा या दोन खेळाडूंमधील संबंध बिघडले होते. तर सूर्या रोहितच्या जवळचा मानला जातो. एवढेच नाही तर गंभीरच्या नेतृत्वाखाली तो केकेआरचा उपकर्णधारही राहिला आहे.

अशा परिस्थितीत मुंबईला आता टी-20 मध्ये भारताचा कर्णधार असलेल्या सूर्याला कोणत्याही किंमतीत कायम ठेवावे लागेल. या आयपीएलपर्यंत मुंबई हार्दिकला भावी कर्णधार मानत होती पण भविष्यातही तो असाच विचार करेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

IPL 2025
Hardik Pandya : वादळानंतर तो सावरला! नताशासोबत घटस्फोटानंतर 2 दिवसांनी हार्दिकने केला नवीन बिजनेस लॉन्च

पंतचे काय होणार?

याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतवर फारसे खूश नसून त्याला कायम ठेवायचे की नाही याचा विचार करत असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. पंतला सोडण्याचा विचारही या संघात सुरू आहे. मात्र, या संघाचा मार्गदर्शक आणि माजी कर्णधार सौरव गांगुली पंतला कर्णधारपदावर ठेवण्याच्या बाजूने आहे.

जर दिल्ली आणि पंत यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली तर महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज त्याला घेऊन जाऊ शकते. धोनी आणि पंत किती जवळचे आहेत हे कोणापासून लपलेले नाही. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर सीएसकेने यंदा ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवले.

IPL 2025
IPL 2025 मध्ये कोहली-पांड्याचा पगार वाढणार? BCCI आणि IPL मालकांची बैठक

राहुल लखनौमधून जाणार बाहेर?

लखनौ आणि राहुलचे संबंध काही चांगले दिसत नाहीत. गेल्या आयपीएल हंगामात एका सामन्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार राहुल यांच्यात मैदानावर झालेल्या चर्चेचा व्हिडिओ खूप गाजला होता.

राहुल कर्नाटकचा असून आरसीबी त्याच्यावर सट्टा लावू शकतो. यावेळी आयपीएलपूर्वी मोठा लिलाव होणार असल्याने आणि बीसीसीआयने खेळाडूंना कायम ठेवण्याचे नियम अद्याप जारी केलेले नसल्यामुळे त्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल कारण संघ त्यानुसार रणनीती बनवतील.

एका परदेशी खेळाडूसह चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाल्यास तीन भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईसाठी खूप कठीण जाईल. मेगा लिलावात पुढील पाच वर्षांसाठी सर्व संघ आपला संघ बांधण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.