गुजरात टायटन्सला आठव्या विजयाची प्रतीक्षा, बंगळूरविरुद्ध आज सामना

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत असलेला गुजरात टायटन्सचा संघ दमदार कामगिरी करतोय.
 IPL Today Match 2022
IPL Today Match 2022SAKAL
Updated on

IPL 2022 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत असलेला गुजरात टायटन्सचा संघ दमदार कामगिरी करतोय. या संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी सात लढतींमध्ये या संघाने विजय मिळवले आहेत. गुणतालिकेतही हा संघ पहिल्या स्थानावर आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघासमोर उभा ठाकणार आहे. फाफ ड्युप्लेसिसच्या बंगळूरची मागील दोन लढतींत हार झाली आहे. त्यामुळे पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी बंगळूर संघ मैदानात उतरेल.

गुजरातचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने धमक दाखवून दिली आहे. त्याने ३०५ धावा केल्या असून ४ फलंदाजांनाही त्याने बाद केले आहे. डेव्हिड मिलर (२३७ धावा), शुभमन गिल (२२९ धावा) यांनीही छान फलंदाजी केली आहे. राहुल तेवतिया (१३६ धावा) व राशीद खान (७१ धावा) यांनी; तर सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी केली आहे. रिद्धिमान साहाला (१०४ धावा) संघात घेण्याचा निर्णयही पथ्यावर पडला आहे.

पुन्हा नजरा विराटवर

बंगळूर संघाला फलंदाजांचे अपयश सतावत आहे. विराट कोहली, फाफ ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल या अव्वल फलंदाजांकडून धावाच होत नाहीत. या संघातील पहिल्या चार क्रमांकाची एकूण फलंदाजी सरासरी फक्त २१.९० इतकी आहे. विराटला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीवरच सर्वांच्या नजरा असणार आहेत.

सहा भिन्न मॅचविनर्स

गुजरातने जिंकलेल्या सातपैकी सहा सामन्यात भिन्न मॅचविनर्स पुढे आले आहेत. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राशीद खान हे सामनावीर ठरले आहेत. याचा अर्थ गुजरातचा संघ सांघिक यश प्राप्त करीत आहे. संघाला गरज असताना कुणी ना कुणी पुढे येत आहे. शमी (१३ बळी), फर्ग्युसन (९ बळी), राशीद (८ बळी) हे गोलंदाज चमकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.