Ishan Kishan: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी (27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला होता. अरुण जेटली स्टेडियवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी रोमांचक विजय मिळवला.
दरम्यान, असे असले तरी या सामन्यानंतर मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने कारवाई केली आहे. त्याच्यावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंडाची कारवाई झाली आहे.
बीसीसीआयने या सामन्यानंतर दिलेल्या माहितीनुसार ईशान किशनने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक कली आहे. त्याने त्याची चूक मान्य केली असून कारवाईही मान्य केली आहे.लेव्हल 1 च्या चुकीसाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो.
दरम्यान, बीसीसीआयने ईशानकडून सामन्यादरम्यान नक्की काय चूक झालेली याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही.
तरी, आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.2 हे क्रिकेटच्या साधारण कृतींव्यतिरिक्त अतिरिक्त वेगळी कृती, जसे की स्टंपला मारणे किंवा जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे जाहिरातींचे बोर्ड, बाईंड्री लाईन, ड्रेसिंग रुमचे दरवाजे, आरसे, खिडक्या किंवा इतर गोष्टींचे नुकसान करण्याबाबत आहे.
यामध्ये सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणांचा गैरवापर देखील समाविष्ट आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी 258 धावांचे आव्हान ठेवले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 247 धावाच करता आल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 63 धावांची खेळी केली, तसेच कर्णधार हार्दिक पांड्याने 46 धावा केल्या.
अन्य कोणाला खास काही करता आले नाही. ईशान किशनही 20 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून गोलंदाजीत मुकेश कुमार आणि रसिख दार सलाम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 257 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून फ्रेझर-मॅकगर्कने 27 चेंडूत 84 धावा केल्या, तसेच शाय होपने 41 धावांची आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 48 धावांची खेळी केली.
मुंबईकडून गोलंदाजीत मोहम्मद नबी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्युक वूड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Ishan Kishan fined after DC vs MI IPL 2024 Match)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.