IND vs AUS: WTC फायनलमध्ये हा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग! शुभमन गिलचा पत्ता कट?

India vs Australia WTC Final 2023
India vs Australia WTC Final 2023
Updated on

India vs Australia WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सात जूनपासून खेळल्या जाणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हा सामना होणार असून, त्यासाठी जोरदार तयारीही सुरू झाली आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे अणार आहे, आजुन त्याच्याकडे सलामीची जबाबदारीही असेल.

India vs Australia WTC Final 2023
Sunil Gavaskar WTC Final : रोहितने संघातील 'या' खेळाडूचा सल्ला घ्यावाच... गावसकरांनी कोणाची केली इतकी स्तुती?

रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

धडाकेबाज सलामीवीरांमध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराची गणना केली जाते. त्याने अलीकडेच आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले, ज्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. रोहित आता लंडनला रवाना झाला आहे जिथे टीम इंडिया 7 जूनपासून WTC फायनल सामना खेळणार आहे. सध्या असे मानले जात आहे की शुभमन गिल त्याचा सलामीचा जोडीदार असेल, परंतु भारताचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंगने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

India vs Australia WTC Final 2023
IPL 2023: आयपीएल संपली अन् हा खेळाडू झाला तंदुरुस्त! फ्रँचायझीला लावला 16.25 करोडोंचा चुना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी इशान किशन एक्स फॅक्टर ठरू शकतो, असा विश्वास भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी व्यक्त केला आहे. रस्ता अपघातात ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे केएस भरत आणि इशान किशन यांना संघात ठेवण्यात आले आहे. दोघांची यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे. ईशानने अजून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही पण सरनदीपच्या मते तो एक्स-फॅक्टर ठरू शकतो. किशनने आतापर्यंत 14 वनडे आणि 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

India vs Australia WTC Final 2023
Asia Cup 2023 BCCI vs PCB : इस में तेरा घाटा... बीसीसीआय पाकिस्तानला देणार जोरदार झटका

शुभमनने अलीकडेच आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ऑरेंज कॅपही जिंकली. पण इशानची प्लेइंग-11 मध्ये यष्टिरक्षक म्हणून निवड झाल्यास संघ व्यवस्थापनाला अडचणी येऊ शकतात. सरनदीपच्या मते, जरी इशान एक्स-फॅक्टर बनू शकतो, तरीही WTC फायनलमध्ये केएस भरतला यष्टिरक्षक बनवणे जवळपास निश्चित आहे. 29 वर्षीय भरतने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 4 कसोटी सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.