WTC Final Team India Squad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले. यापैकी एक नाव केएल राहुलचे देखील आहे. बीसीसीआयने राहुलच्या जागी ईशान किशनला संघात स्थान दिले आहे. मात्र या निर्णयावर क्रिकेट चाहते अजिबात खूश नाहीत.
राहुलच्या जागी इशान किशनच्या निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयावर क्रिकेट चाहते नाराज आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की इशान किशनच्या जागी संजू सॅमसन आणि सरफराज खानसारखे खेळाडू राहुलच्या जागी मोठे दावेदार होते.
सरफराज खानने रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने स्वत:ला सिद्ध केले आहे, परंतु तरीही BCCI ला त्याला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान देणे योग्य वाटले नाही. तर आयपीएल मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल चा कर्णधार संजूला सुद्धा संधी दिले नाही. या निर्णयावर चाहते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.
जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत संजूला संघाचा भाग बनवण्यात आले. पहिल्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली मात्र त्याला केवळ 5 धावाच करता आल्या. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो पुढील दोन सामन्यांसाठी संघाबाहेर गेला. तेव्हापासून तो टीम इंडियात कोणत्याही संघाचा भाग नाही.
सरफराजच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये जवळपास 80 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. मागील पाच सामन्यांतील 8 डावात त्याच्या बॅटने तीन शतके आणि एक अर्धशतकांसह एकूण 851 धावा केल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडे बॅकअप यष्टिरक्षक म्हणून पाहिले जाईल, अशी अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही.
WTC फायनलसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन.
स्टँडबाय खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.