DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Jake Fraser-McGurk: मुंबई इंडियन्सविरुद्ध 27 चेंडूत 84 धावा करणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा विक्रम केला आहे.
Jake Fraser-McGurk | Delhi Capitals | IPL 2024
Jake Fraser-McGurk | Delhi Capitals | IPL 2024X/IPL
Updated on

Jake Fraser-McGurk Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (27 एप्रिल) खेळवला जात आहे. अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर जॅक फ्रेझर-मॅकगर्कने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले होते. यावेळी दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल हे सलामीला फलंदाजीला उतरले. फलंदाजी आल्यानंतर फ्रेझर-मॅकगर्कने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजी सुरु केली. त्याने पहिल्या षटकातच 19 धावा चोपल्या.

दरम्यान त्याने अवघ्या 15 चेंडूतच अर्धशतक केले. त्याने यंदाच्या हंगामातील त्याचे हे तिसरे अर्धशतक असून त्याने दुसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक केले आहे.

त्यामुळे दिल्लीसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या आपल्याच विक्रमाशी फ्रेझर मॅकगर्कने बरोबरी केली आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही 15 चेंडूत अर्धशतक केले होते.

Jake Fraser-McGurk | Delhi Capitals | IPL 2024
T20 World Cup 2024: झहीर खानच्या टीम इंडियात एकच विकेट-किपर, तर तीन ऑल-राऊंडर; जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना दिली संधी

त्याच्यापूर्वी दिल्लीसाठी आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम ख्रिस मॉरिसच्या नावावर होता. त्याने 17 चेंडूत गुजरात लायन्सविरुद्ध 2016 मध्ये अर्धशतक केलं होतं. दरम्यान, हा विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने दोनदा मोडला आहे.

विशेष म्हणजे फ्रेझर-मॅकगर्क दिल्ली संघात आयपीएल 2024 स्पर्धा सुरू झाल्यानंतर दुखापतग्रस्त लुंगी एन्गिडीचा बदली खेळाडू म्हणून सामील झाला होता. पण असे असले तरी त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपली दखल सर्वांना घ्यायला लावली आहे.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक

  • 15 चेंडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2024

  • 15 चेंडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2024

  • 17 चेंडू - ख्रिस मॉरिस, विरुद्ध गुजरात लायन्स, 2016

  • 18 चेंडू - ऋषभ पंत, विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2019

Jake Fraser-McGurk | Delhi Capitals | IPL 2024
T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

सर्वात वेगवान शतकाची संधी हुकली

मुंबईविरुद्ध मॅकगर्क आक्रमक खेळ करत होता. परंतु, मात्र त्याला 8 व्या षटकात पीयुष चावलाने बाद केलं. त्याचा झेल डीप मिडविकेटला मोहम्मद नबीने पकडला.

फ्रेझर-मॅकगर्कने 27 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. दरम्यान, ही खेळी करताना त्याला एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी होती.

त्याने जर 30 चेंडूंच्या आत शतकाला गवसणी घातली असती, तर तो टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करणारा खेळाडू ठरला असता. मात्र त्याचे शतक 16 धावांनी हुकले आणि त्यामुळे या विक्रमाची संधीही त्याने गमावली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम सध्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात 30 चेंडूत शतक केले होते.

दिल्लीचे मुंबईसमोर भलंमोठं आव्हान

दरम्यान, फ्रेझर-मॅकगर्कव्यतिरिक्त दिल्लीकडून शाय होपने 41 धावांची आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 48 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने 20 षटकात 4 बाद 257 धावा केल्या आणि मुंबईसमोर 258 धावांचं लक्ष्य ठेवलं. (Jake Fraser-McGurk 15 balls Fifty)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.