Jasprit Bumrah: मोठ्या मनाचा बुमराह! मुंबई हरली, पण छोट्या फॅनला असं केलं भलतंच खूश, पाहा Video

Jasprit Bumrah Fan Video: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने एका छोट्या फॅनला अविस्मरणीय अशी भेट दिली आहे.
Jasprit Bumrah Fan Video
Jasprit Bumrah Fan VideoX/mipaltan
Updated on

Jasprit Bumrah Fan Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 48 वा सामना मंगळवारी (30 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात लखनौने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र मुंबईचा हा 7 वा पराभव ठरला आहे.

असे असले तरी या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक छोटा फॅन मात्र भलताच खूश झाला, त्याला कारणही तसेच ठरले. त्या छोट्या फॅनला बुमराहकडून एक अनमोल भेट मिळाली.

Jasprit Bumrah Fan Video
Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

झालं असं की एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर बुमराहने स्टँडमधून त्याचा ऑटोग्राफ मागणाऱ्या एका लहान मुलाला पाहिलं आणि डोक्यावरील पर्पल कॅप काढून लगेचच त्याला दिली. इतकंच नाही, तर त्याला ऑटोग्राफही दिला.

यानंतर तो चाहता इतका आनंदित झाला की तो पळत अत्यंत आनंदाने उड्या मारत निघून गेला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे. तसेच बुमरागचंही कौतुक होत आहे.

विशेष कौतुक यासाठी होत आहे की आयपीएलमध्ये पर्पल कॅप त्या खेळाडूच्या डोक्यावर असते, ज्याने हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा बुमराहने १० सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या असल्याने तो हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे.

Jasprit Bumrah Fan Video
T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

दरम्यान, बुमराहकडे जरी पर्पल कॅप असली, तरी त्याचा संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र फारशी चांगली झालेली नाही. मुंबईला 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला असून केवळ ३ सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

मंगळवारीही झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या होत्या. मुंबईकडून नेहल वढेराने सर्वाधिक 46 धावा केल्या होत्या. तसेच टीम डेव्हिडने 35 धावा केल्या होत्या. लखनौकडून मोहसिन खानने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनौने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने आक्रमक 62 धावांची अर्धशतकी खेळ केली. मुंबईकडून 2 विकेट्स कर्णधार हार्दिक पांड्याने घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.