Jasprit Bumrah Not Join Mumbai Indians : आयपीएल 2024 चा थरार येत्या 22 मार्चपासून रंगणार आहे, त्यात मुंबई इंडियन्सचा सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये सराव करत आहे, मात्र आत्तापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू शिबिरात सहभागी झालेले नाहीत. यामुळे मुंबई इंडियन्स संघात काय तरी बिनसलं असा अंदाज लावला जात आहे. सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांच्या मते हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यानंतर अनेक खेळाडू खूश नाहीत, त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये काही ठीक नाही.
अलीकडेच भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली. जसप्रीत बुमराह त्या भारतीय संघाचा एक भाग होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह 21 मार्चला थेट अहमदाबादला पोहोचेल, जिथे तो मुंबई इंडियन्स संघात सामील होईल.
त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा संघ 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सराव करत आहे. जसप्रीत बुमराहच्या न येण्याबाबत सतत तर्कवितर्क लावले जात होते, परंतु असे मानले जाते की इंग्लंड कसोटी मालिकेमुळे तो मुंबई इंडियन्सच्या शिबिराचा भाग होऊ शकला नाही.
या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने अष्टपैलू हार्दिक पांड्याला आपला कर्णधार बनवले आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवणार आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले होते. यानंतर त्याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
खरं तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र त्याच्या जागी हार्दिक पांड्याने कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर अनेक वरिष्ठ खेळाडू खूश नसल्याचे बोलले जात होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.