RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

RCB vs CSK
RCB vs CSK Jio Viewership esakal
Updated on

RCB vs CSK Viewership : रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील 18 मे रोजी झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात आरसीबीनं चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफचं तिकीट पटकावलं. आरसीबीने सलग सहा सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफ गाठलं. 18 मे रोजी झालेल्या सामन्यात भारताचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी खेळत होते. त्यामुळे संपूर्ण क्रीडा जगताचे या सामन्याकडे लक्ष होते. याचा चांगलाच फायदा जिओ सिनेमाला झाला आहे.

RCB vs CSK
Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

जिओ सिनेमाने या सामन्यात व्ह्युवरशिपचे सर्व रेकॉर्ड तोडले. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात एका सामन्याला इतकी व्ह्युवरशिप कधी मिळाली नव्हती. आरसीबी आणि सीएसके सामन्यात जिओ सिनेमावर जवळपास 50 कोटी लोकांनी सामना लाईव्ह पाहिला.

आरसीबी आणि चेन्नईचा सामना हा कायम हाय व्होल्टेज असतो. आयपीएल 2024 हंगामाची सुरूवात देखील सीएसके आणि आरसीबीनेच झाली होती. हा सामना 38 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला होता. विशेष म्हणजे आयपीएल 2024 च्या हंगामातील सर्वात जास्त व्ह्युवरशिप देणारे सामने हे चेन्नई आणि आरसीबीमध्ये खेळवले गेले आहेत.

यावरून या दोन संघांची फॅन फॉलोईंग किती जबरदस्त आहे हे लक्षात येते. आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. शेकडो फॅन्स बंगळुरूच्या रस्त्यावर उतरून जल्लोष करत होते.

RCB vs CSK
MS Dhoni RCB vs CSK : 110 मीटर सिक्स अन् उदास चेहरा... हीच काय ती धोनीची शेवटची आठवण? 

आरसीबी आणि सीएसके यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक झाला. आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी 18 धावांनी विजय आवश्यक होता. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आरसीबीला पात्र ठरणे कठीण होईल असे वाटत होते, परंतु आरसीबीने स्कोअर बोर्डवर २१८ धावांची मोठी मजल मारली.

यानंतरही, शेवटी क्षणभर CSK हा सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु RCBचा वेगवान गोलंदाज यश दयालने शानदार गोलंदाजी करत RCBला प्लेऑफसाठी पात्र ठरविले.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.