JioCinema Records GT vs CSK IPL 2023 : चेपॉक स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यादरम्यान डिजिटल माध्यमातून आयपीएल 2023 चे प्रसारण करणाऱ्या Jio Cinema ने मागील सर्व रेकॉर्ड तोडले.
क्वालिफायर-1 च्या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान विक्रमी 2.50 कोटी लोकांनी एकाच वेळी थेट सामन्याचा आनंद घेतला. जिओ सिनेमाच्या इतिहासात कोणत्याही सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. या सामन्याने एक महिना जुन्या आयपीएल सामन्यादरम्यान केलेला विक्रम मोडला आहे.
महेंद्रसिंग धोनीचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच वेगळाच उत्साह असतो. अशा परिस्थितीत सीएसकेच्या सामन्यांदरम्यान प्रेक्षकसंख्या आपसूकच वाढते. एप्रिल महिन्यात सीएसकेचा 17 तारखेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना होता. या सामन्यादरम्यान 2.40 कोटी लोकांनी एकाच वेळी जिओ सिनेमावर थेट आयपीएल सामन्याचा आनंद घेतला. आता क्वालिफायर-1 दरम्यान 2.50 कोटींचा सर्वात मोठा विक्रम समोर आला आहे.
सोशल मीडियावरही चाहते धोनीच्या सामन्यादरम्यान केलेल्या या नव्या विक्रमाचा स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. CSK ने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अशा परिस्थितीत विजेतेपदाच्या सामन्यात जिओ सिनेमावर प्रेक्षकांचा नवा विक्रम पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. CSK ने 20 षटकात 7 गडी गमावून 172 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना जीटी संघाला या सामन्यात 15 धावांनी पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याच्या संघाला क्वालिफायर-2 च्या माध्यमातून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी अजूनही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.