Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Jitesh Sharma
Jitesh Sharma Captain PBKS vs SRHesakal
Updated on

Jitesh Sharma Captain PBKS vs SRH : पंजाब किंग्जचा विकेटकिपर फलंदाज जितेश शर्मा पंजाब किंग्जचा कर्णधार होणार आहे. तो आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यात पंजाबचे नेतृत्व करेल. हा सामना सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध होणार आहे. पंजाब किंग्जचा काळजीवाहू कर्णधार सॅम करन मायदेशी परतला असून तो पाकिस्तानविरूद्ध टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो अजून संघात परतलेला नाही.

Jitesh Sharma
Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात सर्वात आधी प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर फेकला गेला होता. पंजाब किंग्जला यंदाच्या हंगामात आतापर्यंत फक्त 5 सामने जिंकता आले आहे. त्यांना आठ सामन्यात पराभव पहावा लागला होता. सध्या ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.

पंजाब किंग्जने हंगामाच्या सुरूवातीलाच जितेश शर्माला उपकर्णधार केलं होतं. मात्र शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं नाही. त्याच्या ऐवजी सॅम करनला कर्णधार करण्यात आलं. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाला फार मोठं यश काही मिळालं नाही.

Jitesh Sharma
Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

पंजाब किंग्ज संघ :

प्रभसिमरन सिंग, रिली रूसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (w/c), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नाथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, तनय त्यागराजन, ऋषी धवन, हरप्रीत सिंग भाटिया, शिखर धवन, ख्रिस वोक्स, अथर्व तायडे, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंह

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.