MI IPL 2023 : कसोटी मालिकेपूर्वी मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा घातक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Jofra Archer Injury :
Jofra Archer Injury :
Updated on

Jofra Archer Injury : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा जल्लोष वाढतो. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

Jofra Archer Injury :
IPL 2023 Playoffs Scenarios : लखनऊसाठी शेवटची संधी! मुंबई हरवल्यास प्ले-ऑफ मधुन होणार का बाहेर? जाणुन घ्या समीकरण

जोफ्रा आर्चरची स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे. यामुळे तो संपूर्ण उन्हाळा इंग्लंड संघातुन बाहेर राहणार आहे. आर्चर चालू असलेल्या IPL 2023 च्या मध्यभागी घरी परतला आणि अलीकडील स्कॅन्समध्ये त्याच्या उजव्या कोपरात फ्रॅक्चर दिसून आले. वेगवान गोलंदाज आता इंग्लंड वैद्यकीय टीमसोबत वेळ घालवेल.

Jofra Archer Injury :
IPL 2023 Playoff Scenarios : DC अन् SRH प्रवास संपला! पण या 4 संघांचे तोडू शकतात प्ले-ऑफचे स्वप्न… जाणून घ्या समीकरण

ईसीबीचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले की जोफ्रा आर्चरसाठी हा निराशाजनक आणि त्रासदायक काळ आहे. तो कोपराच्या दुखापतीने त्रस्त असून त्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्याच्या बरे होण्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की आम्ही जोफ्राला त्याच्या सर्वोत्तम आणि विजयी खेळाकडे परत पाहू.

पण यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो त्याच्या पायाच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि तो आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत संघात पुनरागमन करेल. त्याचबरोबर हा खेळाडू अॅशेसमध्येही खेळताना दिसणार आहे.

आयर्लंड कसोटीसाठी इंग्लंड संघ :

बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, ख्रिस वोक्स, मार्क वुड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.