IPL 2024 : जोफ्रा आर्चर RCB कडून IPL खेळणार? 'या' पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

आर्चरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बेंगळुरूमधील आरसीबी कॅफेमध्ये बसलेला दिसत आहे.
Jofra Archer Play IPL For RCB Marathi news
Jofra Archer Play IPL For RCB Marathi news
Updated on

Jofra Archer News : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सध्या भारतात आहे. पण यंदाच्या आयपीएल लिलावासाठी त्याने आपले नाव दिले नव्हते. त्यामुळे आर्चर आयपीएलमध्ये दिसेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण त्याआधी, त्याने अलीकडेच अशी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, जी पाहून आर्चर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील होणार असल्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांना बांधला जात आहे.

22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2024 च्या उद्घाटन सामन्यापूर्वी रविवारी आर्चरच्या एका इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

Jofra Archer Play IPL For RCB Marathi news
RCB Win WPL 2024 : ट्रॉफी ताफ्यात आली रे...! बंगळुरू चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने स्मृतीला केला व्हिडिओ कॉल

आर्चरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बेंगळुरूमधील आरसीबी कॅफेमध्ये बसलेला दिसत आहे. आता त्याची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्चर आरसीबीमध्ये सामील होऊ शकतो असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. यावर आरसीबीने काहीही सांगितले नाही आणि आर्चरनेही स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

शस्त्रक्रियेनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर बेंगळुरूमध्ये आहे. त्याने आपल्या देशाच्या काऊंटी संघ ससेक्सविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यात भाग घेतला. या सामन्यात तो कर्नाटककडून प्लेइंग इलेव्हन खेळला. सात षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावांत दोन बळी घेतले. आर्चर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.

Jofra Archer Play IPL For RCB Marathi news
RCB vs DC : 21 वर्षीय श्रेयंका पाटीलने रचला इतिहास! WPL च्या फायनलमध्ये अशी कामगिरी करणारी पहिली बनली खेळाडू

आर्चरने शेवटचा व्यावसायिक सामना मार्च 2023 मध्ये खेळला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आर्चरला कोपरच्या दुखापतीमुळे स्पर्धेच्या मध्यभागीच स्पर्धा सोडावी लागली आणि मे महिन्यात त्याच्यावर कोपराची शस्त्रक्रिया झाली.

मुंबई इंडियन्सने आर्चरला सोडले होते. यानंतर आर्चरने 2024 सीझनच्या लिलावातही आपले नाव दिले नाही. ईसीबीने त्याला कामाचा ताण व्यवस्थापित करण्यास सांगितले आणि म्हणून लिलावात त्याचे नाव देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.