Jos Buttler : राजस्थान रॉयल्सच्या स्टार खेळाडूने चालू IPL मध्येच अचानक केली मोठी घोषणा

Jos Buttler News : आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.
Jos Buttler Changes his Name News Marathi
Jos Buttler Changes his Name News Marathi
Updated on

Jos Buttler Changes his Name : आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.

सध्या राजस्थान पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता आयपीएल 2024 दरम्यान राजस्थानच्या एका स्टार खेळाडूने मोठे पाऊल उचलले आहे. खरं तर, या खेळाडूने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Jos Buttler Changes his Name News Marathi
लोकसभा निवडणूक नाही तर 'या' कारणामुळे पुन्हा बदलणार IPL 2024 चे शेड्यूल?

खरं तर, इंग्लंडचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने अधिकृतपणे आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जोस बटलरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये बटलर नाव बदलण्याचे कारण सांगत आहे.

Jos Buttler Changes his Name News Marathi
IPL 2024 : 'कोण जिंकलं काय फरक पडतोय मी इथं फक्त...' धोनीच्या तुफान खेळीनंतर जुने ट्विट व्हायरल

व्हिडिओमध्ये जोस बटलरने सांगितले की, लोक त्याला चुकीच्या नावाने हाक मारतात, त्याच्या मेडलवरही नाव चुकीचे लिहिले गेले आहे. त्याच्या आईनेही चुकीचे नाव लिहायला सुरुवात केली. तो पुढे म्हणाला की, 13 वर्षे इंग्लंडकडून खेळल्यानंतर आणि 2 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता मी अधिकृत जोश बटलर आहे.

Jos Buttler Changes his Name News Marathi
IPL 2024 : बीसीसीआयनं आयपीएल संघमालकांसोबत बोलावली अचानक बैठक; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली, आणि त्यांचे दोन्ही सामने जिंकले, परंतु संघाचा सलामीवीर जोश बटलर अद्याप त्याच्या फॉममध्ये दिसला नाही. जोश बटलर फलंदाजी करताना खूप संघर्ष करताना दिसला आहे. आतापर्यंत बटलरच्या बॅटमधून एकही चमकदार खेळी झालेली नाही.

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी त्याने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. बटलर इंग्लंडसाठी एकदिवसीय वर्ल्ड कप 2019 विजेत्या संघाचा देखील सदस्य होता.

तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो आणि त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले असून त्यात त्याने 3245 धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच शतकेही झळकावली आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.