अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. या शतकाबरोबरच जॉस बटलरने विराट कोहलीच्या दोन विक्रमांशी बरोबरी केली. (Jos Buttler Equals Two Virat Kohli IPL Records after Crafted Century In RCB vs RR IPL 2022)
जॉस बटलरने आयपीएलच्या एका हंगामातील चौथे शतक ठोकले. याचबरोबर त्याने विराट कोहलीच्या एका हंगामात चार शतके ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीने हा विक्रम 2016 ला केला होता. या विक्रमानंतर बटलरने षटकार मारत सामना संपवला. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली.
जॉस बटलरने आजच्या सामन्यात विराटच्या विक्रमाशी बरोबर केली त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शंभर करणाऱ्यांच्या यादीत देखील विराटच्या बरोबरीत आला आहे. विराट कोहलीचे 5 आयपीएल शंभर आहेत तर जॉस बटलरचे देखील 5 आयपीएल शंभर आहेत. या यादीत क्रिस गेल 6 शतके ठोकून आघाडीवर आहे. तर शेन वॉट्सन, डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल हे 3 शतके झळकावून तिसऱ्या स्थानावर आहेत.
राजस्थानने बेंगलोरविरूद्धचा क्वालिफायर 2 सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.