Kevin Pietersen IPL 2024 : मिसाईलपासून वाचण्यासाठी आम्हाला... पिटरसन इराण-इस्त्राइल युद्धात चांगलाच अडकला

Kevin Pietersen
Kevin Pietersen Iran Israel War IPL 2024 esakal
Updated on

Kevin Pietersen Iran Israel War IPL 2024 : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन इराण-इस्त्राइल युद्धामुळे शनिवारी चांगलाच अडकला होता. त्यांच्या विमान अर्ध्यातून माघारी फिरले. यानंतर त्याने सोशल मीडिायवर पोस्ट लिहून या भीतीदायक घटनेची माहिती दिली.

इराणने इस्त्राइलवर मिसाईलने हल्ला चढवला आहे. त्यावेळी पिटरसन भारतात येण्यासाठी विमानात बसला होता. तो अर्ध्या वाटेत आल्यानंतर त्यांचे विमान पुन्हा माघारी फिरले अन् जास्त इंधनसाठ्यासह वेगळ्या मार्गाने भारतात दाखल झालं. केविन पिटरसन हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यासाठी भारतात दाखल होत होता.

Kevin Pietersen
IPL 2024, KKR Vs LSG : अखेर केकेआरने कोड क्रॅक केला; सॉल्टच्या सॉलिड खेळीनं लखनौविरूद्ध साजरा केला पहिला विजय

पिटरसन काय म्हणाला?

केविन पिटरसन आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हणाला की, 'यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. रात्री आमच्या विमानाला परतावं लागलं जास्त इंधन भरून दुसऱ्या मार्गाने यावं लागलं. इराणच्या मिसाईलपासून वाचण्यासाठी आम्हाला आमचा मार्ग बदलावा लागला. असो आता मी मुंबईत आहे. त्यानंतर वानखेडेवर जाणार. हे माझे आवडतीचे क्रिकेट ग्राऊंड आहे.'

Kevin Pietersen
IPL 2024: पुजारा परतणार CSK संघात? मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी केलेल्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

केविन पिटरसन हा आयपीएल 2024 च्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये समालोचन करत होता. मात्र या महिन्याच्या सुरूवातीला त्याला इंग्लंडला परत जावं लागलं होतं. आपल्या कुटुंबासोबत दोन आठवडे घालवल्यानंर तो पुन्हा भारतात परतत होता.

रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात केविन पिटरनस हा पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहे.

Kevin Pietersen
IPL 2024: पुजारा परतणार CSK संघात? मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी केलेल्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

इराणने ड्रोन मिसाईल द्वारे केला हल्ला

इस्राइल आणि इराण यांच्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. इस्त्राइलमधील भारतीय दूतावासाने रविवारी इस्त्राइलमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक मार्गदर्शन अधिसूचना काढली. यात भारतीयांना शांत राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा निर्देश पाळण्याची सुचना देण्यात आली आहे. दूतावासाने परिस्थितीवर आमचे लक्ष असून आम्ही इस्त्राइलच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असंही सांगितलं.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.