KKR Captain Shreyas Iyer Celebration: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची रविवारी (26 मे) सांगता झाली. आयपीएलच्या या 17 व्या हंगामाचे विजेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने पटाकावले.
रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली.
यापूर्वी कोलकाताने 2012 आणि 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
दरम्यान, विजेतेपद जिंकल्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने खास सेलीब्रेशन केले. त्याच्या सेलीब्रेशनने अनेकांना लिओनल मेस्सीने अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजयावेळी केलेल्या सेलीब्रेशनची आठवण झाली.
डिसेंबर 2022 मध्ये अर्जेंटिना फुटबॉल संघाने मेस्सीच्या नेतृत्वाखाली फिफा वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी मेस्सीने वर्ल्ड कप ट्रॉफी स्विकारल्यानंतर ती ट्रॉफी संघाकडे सुपूर्त करताना त्यांच्याकडे पाहात नाचत येत ती ट्रॉफी उंचावली होती.
त्याच्याप्रमाणेच श्रेयस अय्यरनेही आयपीएल 2024 स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर संघसहकाऱ्यांकडे नाचत येत उंचावली. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
कोलकाताच्या विजेतेपदानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'शानदार, संघाकडून हेच अपेक्षित होते. व्यक्त होणे कठीण आहे. आम्ही संपूर्ण हंगामात अजिंक्य असल्यासारखे खेळलो. आत्ता साजरे करण्यासारखे खूप आहे. बोलण्यासाठीही शब्द नाहीत. आम्ही पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी केली.
याशिवाय त्याने सनरायझर्स हैदराबादने संपूर्ण हंगामात केलेल्या कामगिरीबद्दलही कौतुक केले. तसेच म्हटले की लकी होतो की कोलकाताने पहिली गोलंदाजी केली. तसेच त्याने मिचेल स्टार्क आणि आंद्रे रसेलचेही कौतुक केले.
दरम्यान, अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले तर कोलकाताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला 18.3 षटकात अवघ्या 113 धावांवर रोखले होते. त्यानंतर 114 धावांचे लक्ष्य कोलकाताने 10.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.