KKR Star Rinku Singh Story : पोटाची खळगी भरण्यासाठी 'घरकाम' केलेल्या रिंकूनं ठोकला टीम इंडियातील दावेदारीचा शड्डू!

KKR Star Rinku Singh Story
KKR Star Rinku Singh StoryEsakal
Updated on

KKR Star Rinku Singh Story : आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) हंगामातील 13 वा सामना हा इतिहास रचणारा सामना ठरला. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने विजय शंकरच्या 24 चेंडूत ठोकलेल्या 63 धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान ठेवले.

खराब सुरूवातीनंतर केकेआरच्या व्यंकटेश अय्यरने 40 चेंडूत 83 धावा ठोकत सामन्यावर पकड निर्माण केली. मात्र तो बाद झाला अन् राशिदने हॅट्ट्रिक करत केकेआरचे पॉवर हाऊसच उद्ध्वस्त केले. आंद्रे रसेल, सुनिल नरेन आणि शार्दुल ठाकूर हे पाठोपाठ बाद झाले आणि केकेआर पराभवाच्या खाईत लोटला गेला. मात्र नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक झुंजार खेळाचू अजून जिवंत होता. तो म्हणजे रिंकू सिंह!

KKR Star Rinku Singh Story
Rinku Singh IPL 2023 : 6, 6, 6, 6, 6... रिंकूने ठोकले सलग 5 षटकार, गुजरातने जिंकलेला सामना हरला!

उत्तर प्रदेशच्या अलीगढ परिसरातून हातावर पोट असलेल्या कुटुंबातून येणाऱ्या रिंकू सिंहने शेवटपर्यंत हार मानली नाही. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकूच्या साथीला असलेल्या उमेश यादवने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव करून रिंकू सिंहला स्ट्राईक दिली. परिस्थितीशी कसे झुंजायचे हे चांगलेच माहिती असलेल्या रिंकूने हिरो होण्याची संधी ओळखली होती. त्याने यश दयालच्या पुढच्या पाच चेंडूत एक एक करून असे पाच षटकार ठोकले.

रिंकूच्या प्रत्येक षटकारागणिक केकेआरचा विजय जवळ येत होता. तसेच रिंकूही हिरो होत होता. अखेर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 4 धावा हव्या असताना रिंकूने दयालच्या डोक्यावरून समोर षटकार मारला आणि तो केकेआरच्या डगआऊटकडे धावत सुटला.

त्याला मिठी मारण्यासाठी चंद्रकांत पंडित देखील मैदानावर धावले. पंडितांनी रिंकूला मिठी मारली. रिंकू देखील भावनिक झाला होता. मात्र या क्षणाने भारतीय क्रिकेटला अजून एक सामन्य कुटुंबांतील हिरो दिला. रिंकूने 21 चेंडूत 48 धावांची खेळी करून टीम इंडियातील आपल्या हक्काच्या जागेसाठी शड्डू ठोकला आहे. आता फक्त संधी मिळण्याची गरज आहे.

KKR Star Rinku Singh Story
IPL 2023: राशिद खानने कर्णधारपद मिळताच केला मोठा धमाका; हार्दिक झाला जाम खूष

अशी आहे केकेआर स्टार रिंकू सिंहची कहाणी...

केकेआरकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगचे वडील उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका एलपीजी वितरण कंपनीत काम करतात. रिंकूचा भाऊ आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी रिक्षा चालवतो. तर रिंकू घरकाम करून घरातील आठ सदस्यांचे पोट भरण्याचा प्रयत्न करत होता.

रिंकूने 10 वी नंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये गती घेतली. तो लवकरच उत्तर प्रदेशच्या संघात दाखल झाला. त्याने 2016 - 17 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 10 लाखाला खरेदी केले.

मात्र 2018 च्या मेगा लिलावात केकेआरने रिंकूला 80 लाख रूपये देऊन आपल्या गोटात खेचले. तेव्हापासून तो केकेआरचा मधल्या फळीतील एक उमदा फलंदाज झाला आहे. आजच्या खेळीने तर त्याला केकेआरचा स्टार फलंदाज हे पद बहाल केले आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.