IPL 2024 KKR vs PBKS : पंजाबचा कोलकाताच्या घरच्या मैदानात ऐतिहासिक विजय, तब्बल 262 धावांच्या लक्ष्याचा केला यशस्वी पाठलाग

IPL 2024 KKR vs PBKS: आयपीएलच्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध तब्बल 262 धावाच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला
Jony Bairstow | Punjab Kings
Jony Bairstow | Punjab KingsSakal
Updated on

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings: 

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 42 व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्सने मिळवलेला हा विजय ऐतिहासिक विजय ठरला. धावांचा पाठलाग करताना पंजाबने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला.

या सामन्यात कोलकाताने 262 धावांचे आव्हान पंजाबसमोर ठेवले होते, या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 18.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला.

पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 9 षटकार मारले. तसेच शशांक सिंगने 28 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली, तर प्रभसिमरनने 20 चेंडूत 54 धावांची खेळी केली. कोलकाताकडून एकच विकेट सुनील नारायणने घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.