KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

IPL 2024 KKR vs Sunrisers Hyderabad Final Analysis : यंदाच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी केली. संघाने लीगमधील 14 पैकी 8 सामने जिंकले आणि 17 गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहिला.
Sunrisers Hyderabad Final
Sunrisers Hyderabad Finalsakal
Updated on

IPL 2024 KKR vs Sunrisers Hyderabad Final Analysis : यंदाच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी केली. संघाने लीगमधील 14 पैकी 8 सामने जिंकले आणि 17 गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहिला. हैदराबाद गेल्या हंगामात पॉइंट टेबलमध्ये दहाव्या स्थानावर होता, पण यावेळी त्यांनी ज्या प्रकारे पुनरागमन केले ते पाहून चाहते थक्क झाले. यामध्ये संघ मालक काव्या मारन यांची मोठी भूमिका होती. त्याने पॅट कमिन्सच्या कर्णधारपदावर विश्वास व्यक्त केला.

फ्रँचायझीने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांची बोली लावून लिलावात विकत घेतले. आणि कमिन्सने चांगली कामगिरी केली. मात्र, अंतिम फेरीत त्यांच्या संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीपासूनच चुकीचे निर्णय घेताना दिसला.

Sunrisers Hyderabad Final
IPL 2024 Prize Money & Awards: विजेते कोलकाताच नाही, तर हैदराबादही मालामाल; पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही धनवर्षाव

नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा

आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला, जो एकतर्फी झाला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात कमिन्सने नाणेफेक जिंकली. यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला.

नाणेफेकीनंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता की, जर मी नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण पहिल्या डावात खेळपट्टी गोलंदाजीसाठी चांगली आहे. जर कमिन्सने खेळपट्टीचा चांगला अभ्यास केला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन त्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

Sunrisers Hyderabad Final
Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. त्याने केवळ 21 धावांत 3 विकेट गमावल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. तर अभिषेक शर्मा 2 आणि राहुल त्रिपाठी 9 धावा करून आऊट झाले. या फ्लॉप टॉप ऑर्डरमुळे संपूर्ण हैदराबाद संघ अडचणीत आला. येथून संघ अजिबात सावरू शकला नाही आणि 113 धावांवर कोसळला.

स्टार्क आणि रसेलविरुद्ध आखली नाही चांगली रणनीती

पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने हैदराबादला मोठा धक्का दिला. त्याने अभिषेकला क्लीन बोल्ड केले. यासामन्यात स्टार्कने 14 धावा देत दोन विकेट घेतल्या. यापूर्वी क्वालिफायर-1 मध्येही स्टार्कने सुरुवातीचे धक्के दिले होते.

त्या सामन्यातून पॅट कमिन्सला धडा शिकून स्टार्कविरुद्ध चांगली रणनीती बनवायची होती, पण त्याला तसे करता आले नाही. असेच काहीसे आंद्रे रसेलच्या बाबतीत घडले. कमिन्सनेही रसेलविरुद्ध डावपेच आखले नाहीत आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. या सामन्यात रसेलने 19 धावांत 3 बळी घेतले.

Sunrisers Hyderabad Final
IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

या सामन्यात कर्णधार कमिन्सने सर्वात मोठी चूक केली ते म्हणजे.... स्टार फलंदाज हेनरिक क्लासेन सहाव्या स्थानावर खेळवणे. सातत्याने पडणाऱ्या विकेट पडल्यानंतर त्याने स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनला सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. मागील सामन्यात क्लासेनने अर्धशतक ठोकले होते. या सामन्यात कमिन्सने त्याला लवकर मैदानात उतरवले असते तर कदाचित धावसंख्या जास्त होऊ शकली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.