IPL मध्ये आज 'डबल हेडर'चा तडाखा! BCCI ने करारातून हकालपट्टी केल्यानंतर अय्यरला स्वतःला सिद्ध करण्याची संधी

कोलकता-हैदराबाद सामन्यात कमिंस विरुद्ध स्टार्क मुकाबला
KKR vs SRH IPL 2024 Marathi News
KKR vs SRH IPL 2024 Marathi Newssakal
Updated on

KKR vs SRH IPL 2024 Kolkata Knight Riders v Sunrisers Hyderabad : यंदाची आयपीएल सुरू होऊन लगेचच आज शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये कोलकता आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. एकीकडे कोलकताचा कर्णधार श्रेयस अय्यर केंद्रबिंदू असेल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आणि सर्वाधिक रक्कम मिळालेले मिचेल स्टार्क आणि पॅट कमिंस एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात याचीही उत्सुकता असणार आहे.

रिषभ पंतप्रमाणे श्रेयस अय्यरही गतवर्षी पूर्ण आयपीएल स्पर्धेस मुकला होता. यंदा संघात परतल्यावर त्याच्याकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. त्यांचा माजी विजेता कर्णधार गौतम गंभीर आता संघात मेंटॉर म्हणून परतल्यामुळे कोलकता संघ पहिल्या चार संघात स्थान मिळवेल, असे सांगितले जात आहे.

भारतीय संघातून दूर करण्यात आल्यानंतर श्रेयसला रणजी स्पर्धेत खेळण्याची करण्यात आलेली सूचना त्याने दुर्लक्षित केली. परिणामी बीसीसीआयच्या वार्षिक करारात त्याला स्थान देण्यात आले नाही. रणजी उपांत्य आणि अंतिम सामन्यात खेळून त्याने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. रणजी अंतिम सामन्यात ९५ धावांची बहुमोल खेळी साकारही केली. आता भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर त्याला आयपीएलमध्ये मोठा प्रभाव पाडावा लागणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला पूर्ण १४ साखळी सामन्यांसाठी तंदुरुस्ती ठेवावी लागेल.

कोलकता संघात रिंकू सिंग हा हुकमी एक्का आहे. आंद्रे रसेलकडे स्फोटक फलंजीची क्षमता आहे, पण तो बेभरवशाचा आहे.

हैदराबाद संघाला नवीन दिशा आणि आत्मविश्वास देण्याची जबाबदारी पॅट कमिंसवर असेल. फलंदाजीतही तो डेथ ओव्हरमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतो. गोलंदाजीत त्याला भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर आणि वानिंदू हसरंगा कशी साथ देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. हसरंगावर सध्या आयसीसीने कारवाई केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात उपलब्ध असेल की नाही याबाबत काही सांगण्यात आले नाही.

कोलकता ः श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, शकिब हुसेन, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, शेरफान रुदरफर्ड, अंगरिष रघुवंशी, आंद्र रसेल, सुनील नारायण, केएस भर,, फिल सॉल्ट, रेहमतुल्ला गुरबाझ, वैभव अरोरा, चेतन सकारिया, दुशमांथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, मुजीब उर रेहमान, हर्षित राणा आणि सुयश शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद ः पॅट कमिंस (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को यान्सेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.