IPL 2024 : KKR vs SRH सामन्याला दहशतवाद्यांकडून धोका? मैदानातील सुरक्षेत मोठी वाढ

KKR vs srh
IPL 2024 KKR vs SRH Security Tightenedesakal
Updated on

IPL 2024 KKR vs SRH Security Tightened : गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने नुकतेच अहमदाबादच्या विमानतळावरून ISIS च्या चार संशयीत दहशतवाद्यांना अटक केली. हा कारवाई कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वीच करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा पहिला क्वालिफायर समना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांना सामन्यापूर्वी मैदानाची सुरक्षा अत्यंत कडक केली आहे.

KKR vs srh
KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

केकेआर - हैदराबाद सामन्याला दहशतवाद्यांचा धोका

गुजरात पोलिसांनी केकेआर विरूद्ध हैदराबाद सामन्याच्या सुरक्षेसाठी जवळपास 3000 पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. यात 5 डीसीब आणि 10 एसीपी स्तरावरच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. याचबरोबर 800 खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानात पोलिसांचे एक पथक देखील असणार आहे.

पोलिसांना सांगितले की चार संशयीत दहशतवाद्यांच्या अटकेनंतर पोलीस दल सतर्क झालं असून सामन्यादरम्यान अत्यंत कडक सुरक्षा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चाहते सामना पाहण्यासाठी आत जात असताना त्यांची कसून चौकशी होणार आहे.

KKR vs srh
Copa America 2024: मेस्सी करणार अर्जेंटिनाचे नेतृत्व, कोपा अमेरिका स्पर्धेसाठी संघाची घोषणा

पहिल्या क्वालिफायर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर हैदराबाद आजचा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असेल. त्यांच्याकडे मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांनची फौजच आहे. दुसरीकडे केकेआर ही यंदाची आयपीएल जिंकण्यासाठी फेव्हरेट मानली जाते. त्यामुळे आजचा सामना हा अटीतटीचा होईल यात शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामन्यात कोणाचं पारडं जड हे सांगणे अवघड आहे. मात्र हैदराबाद घरच्या मैदानावर जितकी स्ट्राँग दिसते तितकी ती दुसऱ्या व्हेन्यूवर स्ट्राँग नसते. त्यामुळं केकेआरचं पारडं किंचित जड आहे.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.