KL Rahul IPL 2023 : 4,000 मनसबदार! कोहलीला जे जमलं नाही ते केएल राहुलनं करून दाखवलं

KL Rahul IPL Records
KL Rahul IPL Records esakal
Updated on

KL Rahul IPL Records : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आज पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात दमादर अर्धशतकी खेळी केली. या खेळबरोबरच केएल राहुलने एक मोठा माईल स्टोन देखील गाठला. केएल राहुलने आजच्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात जी कामगिरी केली तशी कामगिरी भारताची रन मशिन विराट कोहली, ख्रिस गेल, रोहित शर्मा यांना देखील करता आलेली नाही.

KL Rahul IPL Records
RCB vs DC : पराभवाचा पंजा! दिल्ली कॅपिटल्स काही तळ सोडेना

केएल राहुल हा आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान 4000 आयपीएल धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या 4000 धावा 105 डावात पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 112 डावात आयपीएलमधील 4000 धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा विराट कोहली आहे. त्याने 114 डावात 4000 धावा पूर्ण केल्या. तर विराट कोहलीला अशी कामगिरी करण्यासाठी 128 तर एबी डिव्हिलियर्सला 131 डाव लागले.

विशेष म्हणजे केएल राहुल हा आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम सरासरी (किमान 200 धावांच्या पुढे) असलेला फलंदाज आहे. त्याने 47.06 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. केएल राहुलने आजच्या सामन्यात जरी अर्धशतक ठोकले तरी त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणारे फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी जात होते.

KL Rahul IPL Records
Virat Kohli IPL 2023 : @200! IPL चा 16 वा हंगाम सुरू होताच किंग कोहली आलाय भलत्याच रंगात

सलामीवीर मेयर्स 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा 2 तर क्रुणाल पांड्या 18 धावांची भर घालून माघारी गेला. क्रुणाल पांड्याला कसिगो रबाडाने बाद केले. त्यानंतर आलेला निकोलस पूरन देखील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यामुळे लखनौची अवस्था 2 बाद 110 वरून 4 बाद 111 धावा अशी झाली.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.