KL Rahul Injury : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकला आहे. तो लखनौचा कॅम्प सोडून आधीच बाहेर पडला असून आता तो WTC फायनल देखील खेळू शकणार नाहीये. त्यामुळे बीसीसीआयने WTC फायनलसाठीच्या भारतीय संघात सूर्यकुमार यादवची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचा समावेश स्टँड बाय म्हणून करण्यात आल्याचे वृत्त आहे.
केएल राहुलला 1 मे रोजी वादग्रस्त ठरलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यावेळी तो आयपीएलचे काही सामने मुकणार हे स्पष्ट दिसत होते. मात्र आता त्याची दुखापत पाहून तो उर्वरित आयपीएल हंगाम आणि WTC फायनलला देखील मुकण्याची दाट शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार केएल राहुलने लखनौ सुपर जायंट्सचा कॅम्प सोडला असून तो सध्या मुंबईत आहे. त्याच्या दुखऱ्या पायाचे स्कॅन झाल्यानंतरच तो WTC फायनल खेळी शकतो की नाही हे स्पष्ट होणार आहे. WTC फायनल ही 7 ते 11 जून दरम्यान लंडन येथील ओव्हलमध्ये होणार आहे.
केएल राहुलला दुखापत झाली त्यावेळी त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले नाही. याचबरोबर तो फलंदाजी करण्यास देखील आला होता. मात्र त्याच्या रिपोर्ट्सवरून तो WTC final खेळण्याची शक्यता फार कमी आहे.
रिपोर्टनुसार 'केएल राहुलच्या दुखापतीबाबत सध्या अंदाजच वर्तवले जात आहेत. कारण लखनौ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाने आणि बीसीसीआयने देखील याबाबत स्पष्ट अशी माहिती दिलेली नाही. फक्त इतकंच सांगण्यात येत आहे की त्याला हॅमस्ट्रिंग किंवा हिप इंज्यूरी झाली आहे. 10 महिन्यापूर्वीच राहुलवर जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया जाली होती. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत.'
हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.