IPL 2023 : कृणाल पांड्या बनला लखनऊचा कर्णधार! kl राहुलवर BCCI घेणार निर्णय

kl राहुलच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर

kl rahul injury
kl rahul injury
Updated on

KL Rahul Injury : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध केएल राहुल खेळण्याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. त्याच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यानुसार एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात KL राहुल खेळणार नाही. त्याच्या जागी कृणाल पांड्या संघाचा कर्णधार असणार आहे.

क्रिकबझला मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुलची दुखापत गंभीर असून आता बीसीसीआय त्याच्या लीगमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेणार आहे. याप्रकरणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय पथकाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे.


kl rahul injury
IPL 2023: दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू IPL मधून बाहेर, WTC फायनल खेळण्यावर सस्पेंस

दुखापत गंभीर असताना केएल राहुल सध्या कुठे आहे हा प्रश्न आहे. तर सध्या तो लखनऊमध्येच संघासोबत आहे, जिथे आता थोड्या वेळाने IPL 2023 चा 45 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सीमेजवळ चेंडूचा पाठलाग करताना राहुलला दुखापत झाली होती.


kl rahul injury
Lionel Messi Suspended : बायकोसोबत फिरायला जाणं पडलं महागात! मेस्सी झाला सस्पेंड

केएल राहुल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर. कृणाल पांड्या लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणार आहे. जरी राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फलंदाजी केली होती, पण क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला तेव्हा तेथेही कृणालच कर्णधार होता.

केएल राहुल देखील भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असल्याने, या परिस्थितीत त्याची दुखापत त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे. अशा परिस्थितीत एनसीएचे वैद्यकीय पथक या संदर्भात जो काही सल्ला देईल, तो स्वीकारण्यास बीसीसीआय आणि एलएसजी फ्रँचायझी तयार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.