KL Rahul LSG vs GT : लखनौ सुपर जायंट्स ज्यावेळी गुजरातने ठेवलेले 136 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरली त्यावेळी त्यांनी 14 षटकात 1 बाद 105 धावा केल्या होत्या. केएल राहुल चांगल्या लयीत दिसत होता. लखनौ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र 15 व्या षटकातनंतर सगळे चित्रच पालटले. गुजरातच्या गोलंदाजांनी केएल राहुल आणि येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला टिच्चून मारा करत जखडून ठेवले.
त्यांनी पुढच्या 5 षटकात फक्त 19 धावा दिल्या. सामना आता शेवटच्या षटकात पोहचला होता. लखनौला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या. मात्र मोहित शर्माने शेवटच्या षटकात फक्त 4 धावा देत दोन फलंदाज टिपले. तर लखनौचे दोन फलंदाज धावबाद झाले. अखेर लखनौने हातातला सामना 7 धावांनी गमावला.
सामना गमावल्यानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'काय झालं हे मलाही कळलं नाही मात्र हे घडून गेलं. मी कोणाला दोष देणार नाही. मात्र आज आम्ही दोन गुण गमावले आहे. क्रिकेट हे असंच असतं. मला वाटतं की आम्ही चांगली गोलंदाजी केली. आम्ही त्यांना 135 धावात रोखले. आम्ही फलंदाजीत चांगली सुरूवात केली. मात्र काही गोष्टी घडल्या.'
राहुल पुढे म्हणाला की, 'सात सामन्यात 8 गुण अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आज सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आम्ही सामन्यात आघाडीवर होतो. मी शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत नव्हतो. मी अजू माझे फटके खेळण्याची गरज आहे. गोलंदाजांवर हल्ला चढवायला हवा, मात्र त्यांनी दोन तीन षटके खूप चांगली टाकली. नूर आणि जयंत यांनी चांगली गोलंदाजी केली.'
'आम्ही अजून धोका पत्करायला हवा होता. विकेट्स आमच्या हातात होत्या. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र आम्ही काही चौकार मारण्याच्या संधी गमावल्या. त्यामुळे आमच्यावर शेवटच्या 3 - 4 षटकात दबाव आला. तोपर्यंत आम्ही चांगले खेळत होतो. त्यांनी चागंली गोलंदाजी केली.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.