मुंबई : कर्णधार हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनी रविवारी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत indian premier league (IPL)मध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. हार्दिकने या सामन्यात नाबाद ८७ धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली.
हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल यांनी लहानपणापासूनच भारतीय संघात खेळण्याचं स्वप्नं पाहिलं. एकेकाळी त्यांनी मॅगी खाऊनही दिवस काढलेत; मात्र आपल्या कष्टाळू वृत्तीमुळे त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. हातावर, मानेवर गोंदवलेले टॅटू, महागड्या, आलिशान, ब्रॅण्डेड गाड्या, कपडे हीसुद्धा हार्दिक पांड्याची ओळख आहे.
हार्दिक नेहमीच त्याच्या समोरील आव्हानांचा आनंदाने सामना करत आला आहे. हार्दिकची कारकिर्द अनेकदा वादग्रस्त ठरली. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार आणि दुखापतींचा सामना केला आहे. ८ नोव्हेंबरला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळला. त्यानंतर कंबरेच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करताना अडचणी आल्या.
मुंबई इंडियन्सने हार्दिकला मोकळे केले. त्यानंतर गुजरातने त्याला १५ कोटी रुपयांची किंमत देऊन निवडले. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिल्यानंतर टीकाही झाली; मात्र हार्दिकने आपल्याला कामगिरीतून त्याला उत्तर दिले. महेंद्रसिंग ढोणी हा त्याचा आदर्श आहे. त्यामुळे ढोणीप्रमाणेच हार्दिकही स्वत:ला सिद्ध करू शकला.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यावेळी स्ट्रेचरवरून मैदान सोडावे लागलेला हार्दिक मैदानात परतला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याने लय गमावली होती; मात्र पुन्हा एकदा त्याने आव्हान स्वीकारले. आपल्याप्रमाणेच लय गमावलेल्या डेव्हिड मिलर या फलंदाजावर हार्दिकने विश्वास ठेवला. मिलरनेही हा विश्वास सार्थ ठरवला.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने ९ पैकी ८ सामन्यांतील विजयासह १६ गुण मिळवत वरचे स्थान पटकावले आहे. हार्दिकच्या कणखर नेतृत्वामुळेच हे घडू शकले. कितीही टीका झाली, दुखापती झाल्या, अडचणी आल्या तरीही कठोर परिश्रमांच्या जोरावर यश मिळवता येतं हेच हार्दिकने सिद्ध केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.