Kolkata Knight Riders Phil Salt : सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असून त्यामुळे केकेआर संघाने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
पण केकेआरला या स्थानावर आणणारा स्टार खेळाडू संघ सोडून अचानक घरी गेला. खरं तर, केकेआरचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
फलंदाजीशिवाय फिल सॉल्टनेही या हंगामात यष्टिरक्षकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. खरं तर, ईसीबीने आधीच स्पष्ट केले होते की, इंग्लिश खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या मालिका आणि टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी प्लेऑफपूर्वी मायदेशी परतावे लागेल.
फिल सॉल्ट हा आसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंड संघाचा भाग आहे. आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या सूचनेनुसार तो पाकिस्तानविरुद्धच्या आगामी T20 मालिकेत खेळण्यासाठी परतला आहे.
फिलने या हंगामात 12 सामन्यात 39.54 च्या सरासरीने आणि 182.00 च्या स्ट्राईक रेटने 435 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके, 50 चौकार आणि 24 षटकार ठोकले. तो गेल्यानंतर केकेआरला त्याच्या उणीव भासेल. त्याच्या जागी संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये रहमानउल्ला गुरबाजचा समावेश करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.