KKR vs MI : मुंबई काही तळ सोडेना! केकेआरने पोहोचली सातव्या स्थानावर

Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians
Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians esakal
Updated on

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा 52 धावांनी पराभव करत आपला पाचवा सामना जिंकला. केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचा संघ 113 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरकडून पॅट कमिन्सने 3 तर आंद्रे रसेलने 2 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीवीर इशान किशनने झुंजार खेळी करत 51 धावा केल्या. मात्र मुंबईच्या इतर फलंदाजांना विकेटवर तग धरता आला नाही. केकेआरकडून व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 43 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत 10 धावात 5 विकेट घेतल्या. (Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians Reached on 7th Spot In Point Table)

Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians
MS धोनीचा वयाच्या 40 व्या वर्षी एक आणखी पराक्रम

केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसले. टीम साऊदीने रोहित शर्माला 2 धावांवर तर आंद्रे रसेलने तिलक वर्माला 6 धावांवर बाद केले. आंद्रे रसेलने सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळालेल्या रमनदीप सिंहला 12 धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. टीम डेव्हिड देखील 13 धावांची भर घालून परतला.

मुंबईचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना सलामीवीर इशान किशनने झुंजार अर्धशतकी खेळी केली. पॅट कमिन्सने मुंबईला मोठा धक्का दिला. त्याने झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला 51 धावांवर बाद केले. 15 वे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सने मुंबईला एकाच षटकात तीन धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर इशान किशन, चौथ्या चेंडूवर डॅनियल सॅम्स आणि सहाव्या चेंडूवर मुर्गन अश्विनला बाद करत मुंबईची अवस्था 7 बाद 102 धावा अशी केली.

चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत असताना मुंबईची सर्व भिस्त कायरॉन पोलार्डवर होती. मात्र तो देखील 16 चेंडूत 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो आणि कार्तिकेय (3) पाठोपाठ धावबाद झाले.

Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indians
'भारत आपला शत्रू नाही'; कनेरियाने आफ्रिदीला सुनावले

आयपीएलच्या 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी 60 धावांची सलामी दिली. व्यंकटेश अय्यर आक्रमक फलंदाजी करत होता.

मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेल्या व्यंकटेशला कुमार कार्तिकेयने 43 धावांवर बाद केले. त्यानंतर केकेआरच्या फलंदाजीला गळती लागण्यास सुरूवात झाली. अजिंक्य 25 तर श्रेयस अय्यर 6 धावांची भर घालून माघारी गेले. दरम्यान, नितीश राणाने एक बाजू लावून धरत 43 धावा केल्या.

मात्र जसप्रीत बुमराहने केकेआरला 15 व्या षटकात दोन तर 17 व्या षटकात 3 धक्के दिले. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 10 धावा देत पाच बळी टिपले. अखेर रिंकू सिंहने 19 चेंडूत 23 धावांची खेळी करत केकेआरला 165 धावांपर्यंत पोहचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()