IPL 2024: 16 वर्षीय खेळाडूची KKR संघात एन्ट्री, केशव महाराजलाही मिळाली 'या' संघात संधी

Keshav Maharaj In IPL: कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुजीब उर रेहमानच्या जागेवर 16 वर्षीय खेळाडूची निवड केली आहे, तसेच केशव महाराजही आता आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो.
Kolkata Knight Riders | IPL
Kolkata Knight Riders | IPLSakal
Updated on

IPL 2024 News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सुरु होऊन आता आठवडा झाला आहे. पण आयपीएलचा हा हंगाम सुरु होण्यापूर्वीच काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा धक्का बसला, तर काही खेळाडूंनी विविध कारणांनी माघार घेतली आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचाही समावेश आहे.

कोलकाताचा गोलंदाज मुजीब-उर-रेहमान दुखापतीमुळे आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर अफगाणिस्तानच्याच 16 वर्षीय अल्लाह गजनफर याची निवड करण्यात आली आहे.

Kolkata Knight Riders | IPL
Riyan Parag: 'सामन्यापूर्वी तीन दिवस बेडवर पेन किलर्स खात...', RR च्या विजयाचा हिरो रियान परागचा मोठा खुलासा

गजनफरने अफगाणिस्तानकडून दोन वनडे सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत 3 टी20 आणि 6 लिस्ट ए सामने खळले आहेत. त्याला 20 लाखांच्या मुळ किंमतीत संघात सामील करून घेतले आहे.

त्यामुळे आयपीएल 2024 मधील सर्वात लहान खेळाडूंमध्ये आता त्याचाही समावेश झाला आहे. यापूर्वी 17 वर्षीय क्वेना मफाका मुंबई इंडियन्सकडून या हंगामात खेळला आहे. गजनफर यावर्षी अफगाणिस्तानकडून 19 वर्षांखालील वर्ल्डकपदेखील खेळला आहे.

Kolkata Knight Riders | IPL
R Ashwin: 'कधीकधी आश्चर्य वाटतं की IPL क्रिकेटही आहे का?', अश्विनचं खळबळजनक भाष्य

केशव महाराज राजस्थान संघात सामील

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने काही दिवसांपूर्वीच डाव्या मांडीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे तो देखील या आयपीएल हंगामात खेळणार नाही.

त्याच्या जागेवर आता राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज केशव महाराजला संघात सामील करून घेतले आहे. केशव महाराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 टी20, 44 वनडे आणि 50 कसोटी सामने खेळले असून 237 विकेट्स घेतल्या आहेत.

मात्र अद्याप त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता त्याला आशा असेल की तो राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()