राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचे 224 धावांचे मोठे आव्हान चेस करत आपला हंगामातील सहावा विजय साजरा केला. इडन गार्डनवर जॉस बटलरने शतकी खेळी केली. त्याने सुनिल नारायणच्या 109 धावांच्या शतकी खेळीला जॉस बटलरने नाबाद 107 धावांची शतकी खेळी करत चोख प्रत्युत्तर दिलं. राजस्थानचा हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा रन चेस ठरला. रियान परागने आक्रमक फलंदाजी करत 14 चेंडूत 34 तर रोव्हमन पॉवेलने 13 चेंडूत 26 धावा केल्या.
आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानविरूद्ध 223 धावांचा डोंगर उभा केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने पहिली तीन षटके चांगली टाकली होती.
मात्र त्यानंतर सलामीवीर सुनिल नारायण आणि अंगक्रिश रघुवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत 10 षटकात केकेआरला शंभरी गाठून दिली. मात्र राजस्थान एका बाजूने केकेआरच्या विकेट्स घेतल होतं. दुसऱ्या बाजूनं सुनिल नारायण तडाखे देत होता.
अखेर त्याने 49 चेंडूत आपलं आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर त्याने 56 चेंडूत 109 धावा केल्या. तो बाद झाला त्यावेळी केकेआर 195 धावांपर्यंत पोहचवलं होतं त्यानंतर रिंकू सिंहने शेवटच्या दोन षटकात रिंकू सिंहने फटकेबाजी करत 9 चेंडूत 20 धावा केल्या. यामुळे केकेआरने 20 षटकात 6 बाद 223 धावांपर्यंत मजल मारली.
राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने एकाकी झुंज देत केकेआरचे 224 धावांचे आव्हान चेस करण्याचा प्रयत्न केला. त्याला रोव्हमन पॉवेलने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिल नारायणने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडत राजस्थानच्या अडचणीत वाढ केली.
राजस्थान रॉयल्सने केकेआरच्या 224 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये 2 बाद 76 धावा केल्या. यशस्वी अन् संजू बाद झाल्यानंतर बटलर आणि रियान परागने धडाकेबाज फलंदाजी केली.
सुनिल नारायणने 109 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या जोरावर केकेआरने 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या. रिंकू सिंहने 20 धावांचे योगदान दिलं. अगंक्रिश रघुवंशीने 30 धावा केल्या.
केकेआरचा सलामीवीर सुनिल नारायण सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने 49 चेंडूत शतकी खेळी करत केकेआरला 16 षटकात 184 धावांपर्यंत पोहचवलं.
सुनिल नारायण आणि अंगक्रिश रघुवंशीने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचली. अखेर कुलदीप सेनने अंगक्रिशला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 18 चेंडूत 30 धावा ठोकल्या.
त्यानंतर युझवेंद्र चहलनं कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत केकेआरला तिसरा धक्का दिली. मात्र क्रिजवर असलेल्या सुनिल नारायणने 42 चेंडूत 74 धावा करत संघाला 14 षटकात 150 च्या जवळ पोहचवलं.
पॉवर प्लेच्या पहिल्या तीन षटकात संथ खेळणाऱ्या सुनिल नारायणने शेवटच्या दोन षटकात तुफान फटकेबाजी करत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीच्या साथीने केकेआरला 10 षटकात 101 धावांपर्यंत पोहवचलं. सुनिल अर्धशतक ठोकून तर अंगक्रिश 30 धावा करून नाबाद होते.
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज आवेश खानने फिल्प सॉल्टला 10 धावांवर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. आवेशने आपल्याच गोलंदाजीवर सॉल्टचा झेल पकडला.
राजस्थानच्या गोलंदाजींनी पॉवर प्लेच्या पहिल्या 3 षटकात फक्त 20 धावा केल्या. मात्र क्षेत्ररक्षकांनी झेल सोडल्याने त्यांना एकही विकेट घेता आली नाही.
संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे दोन दिग्गज खेळाडू जॉस बटलर आणि आर. अश्विन हे संघात परतले आहेत. तर केकेआरने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.