कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्सनी पराभव करत आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला.
सुनिल नारायण बाद झाल्यावर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत केकेआरला 12 षटकात 129 धावांपर्यंत पोहचवलं. व्यंकटेश 44 तर श्रेयस 30 धावा करून नाबाद होते.
हैदराबादने 160 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर केकेआरने पॉवर प्लेमध्येच धडाक्यात सुरूवात केली. गुरबाज 14 चेंडूत 23 धावा करून बाद झाल्यावर सुनिल नारायण आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाला 5 षटकात 57 धावांपर्यंत पोहचवलं.
हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सने 24 चेंडूत 30 धावांची खेळी करत संघाला 159 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र रसेलने त्याची खेळी संपली. आता केकेआरला विजयासाठी 160 धावांची गरज आहे.
राहुल त्रिपाठी 55 धावा करून बाद झाल्यावर हैदराबादची अवस्था बिकट झाली. त्यांची अवस्था 5 बाद 101 धावांवरून 15 षटकात 8 बाद 125 धावा अशी झाली आहे.
वरूण चक्रवर्तीने हेन्रिच क्लासेनला बाद करत हैदराबादला पाचवा अन् मोठा धक्का दिला. मात्र हैदराबादनं 11 षटकात 101 धावा करत शतक पाक केलं आहे.
स्टार्कने हैदराबादला पॉवर प्लेमध्येच तीन धक्के दिल्यानंतर हैदराबादला राहुल त्रिपाठीने सावरले. त्याने क्लासेनसोबत भागीदारी रचत संघाला 9 षटकात 80 धावांपर्यंत पोहचवलं.
कोलकात्याचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने अखेर इतिहासातील सर्वोच्च बोली आपल्यावरच का लागली हे दाखवून दिलं. त्याने पॉवर प्लेमध्येच हैदराबादला तीन धक्के देत केकेआरला सामन्यावर पकड निर्माण करून दिली. हैदराबादची अवस्था 5 षटकात 4 बाद 39 धावा अशी केली.
स्टार्कने पहिल्या षटकात हेडला शुन्यावर बाद केल्यानंतर दुसऱ्याच षटकात वैभव अरोराने अभिषेक शर्माला 3 धावांवर बाद करत हैदराबादची अवस्था 1.5 षटकात 2 बाद 13 धावा अशी केली.
मिचेल स्टार्कने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅविस हेडला बाद करत केकेआरला मोठा दिलासा दिला.
सनराईजर्स हैदराबादने केकेआरविरूद्धच्या क्वालिफायर सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील हेड टू हेडमध्ये केकेआरचं पारडंच जड आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात 26 सामने झाले असून त्यातील 17 सामन्यात केकेआरने तर 9 सामन्यात हैरदाबादने बाजी मारली आहे.
प्ले ऑफच्या लढतीत केकेआरने आतपर्यंत आठ सामने जिंकले असून पाचवेळा त्यांचा पराभव झाला आहे. तर हैदराबादने 5 सामने जिंकले असून सहावेळा त्यांचा पराभव झाला आहे.
केकेआर आणि हैदराबादचा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. इथले गेले दोन सामने हे एकही चेंडू न खेळवता वॉश आऊट झाले होते. त्यामुळे क्वालिफायर 1 आणि इलिमिनेटरचा सामना देखील पावसामुळे वाया जाणार का असा प्रश्न चाहत्यांना पडणे सहाजिकच आहे.
मात्र अहमदाबादचे तापमान सध्या 40 च्या घरात पोहचले आहे. मात्र या क्वालिफायर 1 आणि इलिमिनेटर सामन्यादरम्यान म्हणजेच 21 आणि 22 जूनला पावसाची शक्यता नाहीये. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या हंगामातील प्ले ऑफचे दोन सामने तरी पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचे 160 धावांचे आव्हान 13.4 षटकात पार करत 8 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासोबतच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामाची फायनल गाठली. केकेआरकडून श्रेयस अय्यर 24 चेंडूत 58 धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरने नाबाद 55 धावा केल्या. गोलंदाजीत मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेत हैदराबादच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडलं होतं. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सने 30 धावांचे योगदान दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.