KKR vs SRH : कमिन्स टॉसमध्येच गंडला; पिचच्या रंगानं घात केला?

Shreyas Iyer
KKR vs SRH IPL 2024 Final esakal
Updated on

KKR vs SRH IPL 2024 Final : धोनीच्या घरच्या मैदानावर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं आयपीएलची तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली. आयपीएलच्या 17 व्या हंगामाची फायनल एकमद खास ठरली. एकाही संघाला होम अॅडव्हान्टेज नव्हता. त्यामुळं दोन्ही संघांना समान संधी मिळाली. मात्र जय पराजयात खेळाडूंच्या गुणवत्तेसोबतच कॅप्टनचा रोल देखील मोठा राहिला.

सामन्याच्या सुरूवातीलाच म्हणजे टॉसवेळीच केकेआरनं आघाडी घेतली होती. श्रेयस अय्यरनं नाणं हवेत उडवलं मात्र कौल कमिन्सच्या बाजून लागला. मॉडर्न क्रिकेटमध्ये टॉस जिंका सामना जिंका असं इक्वेशन असताना कमिन्स ऐतिहासिक चूक केली. त्यानं तगडी फलंदाजी असून चेस करण्याचा निर्णय घेतला. त्याल वाटलं राजस्थानप्रमाणे याही सामन्यात दवबिंदू अनुपस्थिती दर्शवून हैदराबादचा विजय सुकर करतील.

मात्र पिचच्या पोटात काय दडलंय हे श्रेयस अय्यरला चांगलं माहिती होतं. पिच लाल मातीत तयार करण्यात आली होती. सगळ्यांना वाटत होतं की फिरकी अधिराज्य गाजवणार मात्र केकेआरच्या वेगवान माऱ्यानं हैदराबादची पळता भुई थोडी झाली.

केकेआरचा स्टार मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात हैदराबादला हादरा दिला. त्यानंतर वैभव अरोराच्या स्विंगिंग डिलिव्हरीनं हेडचं डोकं चक्रावलं. तो गोल्डन डक होत पॅव्हेलियनमध्ये परतला. हा हैदराबादसाठी मोठा धक्का होता. यातून सावरण्याचा प्रयत्न माक्ररम अन् उत्साही कार्यकर्ता राहुल त्रिपाठीनं केला. मात्र केकेआर आता टॉपवर होती. मंदावलेल्या हैदराबादला स्टार्कनं तिसरा धक्का दिला.

गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज देणाऱ्या राहुल त्रिपाठीची विकेट त्यानं घेतली होती. पॉवर प्ले संपल्यावर नितीश रेड्डीची शिकार करत हर्षित राणानं आपलं खातं उघडलं. हैदराबादची अवस्था 4 बाद 47 धावा अशी झाली होती.

माक्ररम आणि क्लासेन हे वर्ल्ड क्लास फलंदाज हैदराबादसाठी छातीचा कोट करून उभा राहतील असं वाटलं होतं. मात्र रसेल अन् राणाने या दोन फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. केकेआरनं जवळपास 12 व्या षटकात सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली.

हैदराबाद शंभरच्या आत गुंडाळणार असं वाटत होतं. केकेआरचे वेगवान गोलंदाज हैदराबादचे 8 बॅट्समन 90 धावात गिळून बसले होते. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला बॅट उचलून आपल्या संघाची लाज वाचवण्यासाठी मैदानात उतरावं लागलं होतं. याच हंगामात आयपीएल इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारणारी हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये सर्वात कमी धावात गुंडाळली जाणार होती.

कमिन्स 24 धावा करत संघाला कसंबसं 113 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र तोही हैदराबादसाठी 20 षटकापर्यंत थांबू शकला नाही.

केकेआरसमोर फक्त 113 धावांच आव्हान होतं. फायनल रंजक होईल असं वाटत होतं मात्र आता केकेआर एकतर्फी विजय मिळवण्याचा उंबरठ्यावर होता. केकेआरनं नेहमीप्रमाणं पॉवर प्लेमध्ये धुमाकूळ घालण्याचा इरादा आखला होता. मात्र सुनिल नारायणला कमिन्स 6 धावांवर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. लो स्कोअरिंग मॅच धोक्याची असते.

मात्र केकेआर आज वेगळ्याच मूडमध्ये होती. 10 वर्षे फक्त लांबूनच आयपीएलची ट्रॉफी पाहणारी केकेआर आता ती उंचावण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. जरी नारायण बाद झाला तरी त्याचं काम व्यंकटेश अय्यरनं पूर्ण केलं. त्यानं अर्धशतकी खेळी केली.

त्याला सलामीवीर गुरबाजनं समर्थ साथ दिली. मात्र त्याला विजयी धाव काही घेता आली नाही. तो शाहबाज अहमदची शिकार झाला. अखेर श्रेयस अय्यर मैदानावर अला अन् दोन अय्यरनी मिळून केकेआरला 11 व्या षटकातच फायनल जिंकून दिली. केकेआरनं हैदराबादचा 8 विकेट्स अन् 57 चेंडू राखून पराभव केला. शाहरूखनं स्टँडमधून आयकॉनिक पोज दिली. गंभीरनं शेजाऱ्याला मिठी मारली अन् श्रेयस अय्यरनं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेल्या बीसीसीआयला आपल्या पद्धतीनं उत्तर दिलं. त्यानं जय शहा अन् रॉजर बिन्नींकडून ट्रॉफी स्विकारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com