IPL 2023 Krunal Pandya : आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरी म्हणजेच लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पराभूत केले. या सामन्यातून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामही संघात परतला. पण, तोही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
मार्कराम त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणातच फ्लॉप ठरला. तो गोल्डन डक बनला आणि नंतर संघाचाही पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने 16 षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयासह लखनौ सुपर जायंट्स पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्सच्या विजयात कृणाल पांड्याचा मोठा वाटा होता. त्याने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि त्याच्या धाकट्या भावाच्या म्हणजेच हार्दिक पंड्याचा सर्वात चांगला मित्र केएल राहुलचा संघ जिंकला.
कर्णधार केएल राहुलने तिसऱ्याच षटकातच कृणाल पांड्याकडे चेंडू सोपवला आणि कृणालनेही कर्णधाराच्या भरवशावर राहून मयंक अग्रवालला त्याच्या पहिल्याच षटकात माघारी पाठवले. यानंतर त्याने अनमोलप्रीत सिंग आणि हैदराबादचा कर्णधार इडन मार्करामला तिसऱ्या षटकात सलग 2 चेंडू टाकून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कृणालने आपल्या कोट्यातील 4 षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले. त्याची आयपीएलमधील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कृणालनेही अवघड विकेटवर 23 चेंडूत 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. म्हणजेच हार्दिकच्या स्टाईलमध्ये चेंडू आणि बॅट दोन्हीसह कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
कृणालचा धाकटा भाऊ हार्दिक हा देखील दुखापतीतून बरा झाल्यानंतर आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने पदार्पणाच्या हंगामातच अष्टपैलू कामगिरी करून गुजरात टायटन्सला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले. यानंतर हार्दिकने मागे वळून पाहिले नाही आणि आज तो टी-20 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार आणि वनडेमध्ये उपकर्णधार आहे. आता मोठा भाऊ कृणालही त्याच मार्गावर आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियामध्ये परतण्याची तयारी करत आहे.
कृणाल पंड्या भारताकडून 2021 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. क्रुणालने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तथापि या अष्टपैलू खेळाडूला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी 3 वर्षे वाट पाहावी लागली आणि त्याने 2021 मध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.