Hardik Pandya IPL: आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जात आहे. सोमवारी (22 एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणारा हा सामना मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी खास ठरला आहे.
हार्दिकचा हा मुंबई इंडियन्ससाठी 100 वा टी20 सामना आहे. तो मुंबईकडून 100 टी20 सामने खेळणारा सातवा खेळाडू आहे. त्याचा त्याच्या या विक्रमाबद्दल राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावानंतर गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाकडून खास जर्सी देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्ससाठी 100 वा सामना खेळण्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर हार्दिक म्हणाला, 'मी मुंबई इंडियन्सकडून माझा प्रवास सुरू केला होता. त्यामुळे या फ्रँचायझीसाठी 100 वा सामना खेळण्याबद्दल मला खूप मस्त वाटतंय.मी खूप कृतज्ञ आहे.'
हार्दिकने 2015 ते 2021 दरम्यान मुंबईकडून 92 सामने खेळले होते. त्यानंतर मुंबईने त्याला करारमुक्त केल्यानंतर तो गुजरात टायटन्सकडून आयपीएल खेळला.
विशेष म्हणजे गुजरातचे नेतृत्वही करताना त्याने संघाला 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. तसेच 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता, पण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यानंतर 2024 आयपीएलपूर्वी मुंबईने त्याला गुजरातबरोबरच्या ट्रेडिंगमधून पुन्हा संघात घेतले. त्यामुळे हार्दिकची मुंबईकडे घरवापसी झाली. इतकेच नाही, तर मुंबईने त्याला नेतृत्वाची जबाबदारीही दिली.
दरम्यान मुंबईकडून सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 215 सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ किरन पोलार्ड असून त्याने 211 सामने खेळलेत. यानंतर हरभजन सिंग (158), लसिथ मलिंगा (139), अंबाती रायुडू (139) आणि जसप्रीत बुमराह (136) आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीला उतरण्यापूर्वी मुंबईने नुवान तुषाराला इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टिट्युट म्हणून संघात सामील केले. त्यामुळे त्याचे या सामन्यातून पदार्पण झाले आहे. त्याला पदार्पणाची कॅप जसप्रीत बुमराहकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.