Gautam Gambhir: 'गंभीरला नाचवायचं...', KKR च्या विजेतेपदानंतर शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये काय म्हणाला, पाहा Video

Shah Rukh Khan: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर मेंटॉर गौतम गंभीरला नाचण्याचीही विनंती केली. त्यावर गंभीरची रिअ‍ॅक्शन काय होती, पाहा.
Shah Rukh Khan | Gautam Gambhir
Shah Rukh Khan | Gautam GambhirSakal
Updated on

Shah Rukh Khan - Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. रविवारी चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत केले आणि तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

या विजयानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केले. या सामन्यासाठी कोलताचाचे सहसंघमालक वेंकी म्हैसूरसह शाहरुख खानही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनीही सामन्यानंतर संघाचे कौतुक केले.

दरम्यान, या विजयानंतर शाहरुख आणि वेंकी म्हैसुर यांनी ड्रेसिंग रुममध्येही खेळाडूंना गौरव केला. म्हैसुर यांनी संघातील सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह दिले. त्यांनी शाहरुख खानलाही सन्मानचिन्ह दिले. तसेच त्याची सामन्यादरम्यानची उपस्थिती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी म्हटले.

Shah Rukh Khan | Gautam Gambhir
Rinku Singh: T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघातून वगळल्यानंतर रोहित शर्माशी काय झालेली चर्चा? रिंकुने केला खुलासा

यानंतर शाहरुखने ड्रेसिंग रुममध्ये भाषण केले. त्याने त्याच्या भाषणाला विनोदाचा स्पर्श दिला. त्याने कोलकाताचा मेंटॉर गौतम गंभीरचे विशेष आभार मानताना त्याच्याकडे डान्स करण्याची मागणीही केली.

शाहरुख म्हणाला, 'माझी एकच विनंती आहे, मी गौतम गंभीरचे आभार मानतो. आपण जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा आपण याबद्दल चर्चा केली होती की कदाचीत आपण त्याला नाचवू शकू. सुनील नारायणने आधीच करून दाखवले आहे, मी त्याला नाचताना पाहिलंय. त्यामुळे आज रात्री गौतम गंभीरला आपल्याला नाचवायचे आहे.'

शाहरुखची ही विनंती ऐकून गंभीरही स्मितहास्य करताना दिसला.

Shah Rukh Khan | Gautam Gambhir
Ambati Rayudu: प्लीज हे थांबवा! रायुडूला ऑन-एअर जोकर म्हटल्याबद्दल केवीन पीटरसनने दिलं स्पष्टीकरण

त्यानंतर शाहरुख म्हणाला, 'सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. निरोगी राहा. तुम्ही यापुढे कुठेही गेलात तरी तुम्हाला शुभेच्छा आहेत.'

'मी जय, जुही, जान्हवी, सुहाना, पुजा या आमच्या सर्वांच्या वतीने बोलत आहे. तुमच्यावर आम्ही खूप प्रेम करतो आणि तुम्ही सर्वांनीच आम्हाला भावुक केले. माझी तर इच्छा आहे की हाच संघ कायम राहावा आणि तुम्ही माझी अशीच भाषणं ऐकत राहावीत.'

दरम्यान, गौतम गंभीर आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी कोलकाता संघाचा मेंटॉर म्हणून जोडला गेला होता. त्याआधी त्याने कोलकाता संघाने नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्त्वात कोलकाताने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com