MS Dhoni: धोनीने वानखेडेवर ज्या मुलीला दिलेला बॉल गिफ्ट, ती लकी गर्ल आहे तरी कोण अन् काय म्हणाली? पाहा Video

MS Dhoni Little Fan Video: एमएस धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळताना एका लहान मुलीला एक बॉल गिफ्ट दिला होता.
MS Dhoni | Fan | IPL 2024
MS Dhoni | Fan | IPL 2024Sakal
Updated on

MS Dhoni News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 धावांनी विजय मिळवला होता. या विजयात एमएस धोनीचेही महत्त्वाचे योगदान राहिले होते. इतकेच नाही, तर धोनीच्या एका कृतीने अनेकांची मनंही जिंकली होती.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईकडून शेवटचे चार चेंडू खेळताना 3 षटकारांसह 20 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने ड्रेसिंग रुममध्ये परत जाताना स्टँडमधील एका छोट्या मुलीला चेंडू भेट दिला होता. आता त्याच मुलीने ही खास भेट स्विकारल्यानंतरच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

MS Dhoni | Fan | IPL 2024
LSG vs CSK IPL 2024 : धोनीचे मैदानात येणे 'कानांसाठी' खतरनाक; मॅच संपल्यानंतर मिळाली मोठी वॉर्निंग

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ती लहान मुलगी म्हणाली, 'माझं नाव मेहर आहे. मी तीच लकी मुलगी आहे, जिला धोनी अंकलने हा चेंडू दिला. मी पण क्रिकेट खेळते आणि माझे स्वप्न आहे की मी जर भारतीय संघासाठी खेळले, तर मी हा चेंडूत कोणालातरी भेट देईल.'

दरम्यान, त्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 69 धावांची खेळी केली. तसेच शिवम दुबेने नाबाद 66 धावांची खेळी केली. मुंबईकडून हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.

MS Dhoni | Fan | IPL 2024
MS Dhoni: धोनी वरच्या क्रमांकावर का करत नाही फलंदाजी? अखेर कोच फ्लेमिंगनेच उघडलं मोठं रहस्य

त्यानंतर मुंबईला 20 षटकात 6 बाद 186 धावा करता आल्या होत्या. मुंबईकडून रोहित शर्माने नाबाद 105 धावांची खेळी केली होती. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नव्हते. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

धोनी सध्या शानदार फॉर्ममध्ये

दरम्यान, धोनी आयपीएल 2024 मध्ये दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने केवळ मुंबईविरुद्धच नाही, तर शुक्रवारी (19 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सविरुद्धही 9 चेंडूत 28 धावांची नाबाद खेळी केली. मात्र या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.