LSG vs GT : मयंकविरुद्ध शुभमन लढतीवर लक्ष! फॉर्मात आलेल्या लखनौचा आज गुजरातशी सामना

Lucknow Super Giants vs Gujarat Titans : आपल्या तुफानी वेगामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मयंक यादव आज पुन्हा मैदानात उतरणार आहे आणि त्याचा सामना करायचा आहे तो गतउपविजेत्या गुजरात टायटन्स यांना.
Lucknow Super Giants vs Gujarat Titans
Lucknow Super Giants vs Gujarat Titans News Marathisakal
Updated on

Lucknow Super Giants vs Gujarat Titans : आपल्या तुफानी वेगामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मयंक यादव आज पुन्हा मैदानात उतरणार आहे आणि त्याचा सामना करायचा आहे तो गतउपविजेत्या गुजरात टायटन्स यांना. लखनौचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल, तर गुजरातला गेल्या सामन्यातील पराभवातून सावरायचे आहे.

Lucknow Super Giants vs Gujarat Titans
Virat Kohli : शतक ठोकल... इतिहास रचला... तरी कोहलीच्या नावावर नोंदवला गेला एक लज्जास्पद विक्रम

आयपीएलमधील पहिले दोन सामने आणि या दोन्ही सामन्यांत सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक अशी कामगिरी करणाऱ्या मयंकने आपल्या लखनौ संघाचेही दैव बदलले आहे. त्याने पहिल्या सामन्यात तीन विकेट मिळवताना इंग्लंडचा नावाजलेला फलंदाज जॉनी बेअरस्टॉला बाद करताना टाकलेला चेंडू भन्नाट होता. त्यानंतर बंगळूरविरुद्धही १३ धावांत ३ विकेट अशी कामगिरी करताना ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरुन ग्रीन यांनी आपल्या वेगवान चेंडूने चकवले होते. आज त्याचा सामना भारताचा हुकमी फलंदाज आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याच्याशी होणार आहे. त्यामुळे या द्वंदाकडे सर्वांचे लक्ष असेल.

Lucknow Super Giants vs Gujarat Titans
'यात हार्दिक पांड्याची चूक....', BCCI च्या माजी अध्यक्षाचं मुंबई इंडियन्सच्या कर्णधारबाबत मोठं वक्तव्य

मयंकमुळे वेगवान गोलंदाजीची ताकद वाढलेल्या लखनौची फलंदाजीही तेवढीच सक्षम आहे. कर्णधार केएल राहुलला अजून अपेक्षित सूर सापडेला नसला तरी क्विन्टॉन डिकॉक चांगल्या फॉर्मात आहे, तर निकोरस पुरन कोणत्याही क्षणी गिअर बदलून फेरारी चालवण्याच्या क्षमतेचा आहे. मात्र दुसरीकडे देवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस यांची चिंता लखनौला आहे.

मयंकने आपल्या वेगाने दहशत निर्माण केल्यानंतर दुसऱ्या बाजूने उमेश यादव, नवीन उल हक, यश ठाकूर, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई या लखनौच्या गोलंदाजांचे काम सोपे होत आहे. त्यामुळे गुजरातचे फलंदाज उद्या या इतर गोलंदाजांचा सामना कसा करतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.

लखनौचा संघ दोन-तीन सामन्यांतील दोन विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. आज घरच्या मैदानावर आपली अपराजित मालिका कायम ठेवण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

Lucknow Super Giants vs Gujarat Titans
RR vs RCB : विराटच्या शतकानंतरही RCBला कमी पडल्या धावा... फाफनं पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं?

आयपीएलमध्ये प्रथमच नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलच्या गुजरात संघाने दोन सामने गमावल्यामुळे सध्या ते सातव्या क्रमांकावर आहे. गिलने स्वतः गेल्या सामन्यात ४८ चेंडूंत नाबाद ८९ धावांची खेळी साकार केली होती. दोनशे धावांचे आव्हान देऊनही त्यांना पंजाबविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. गिलला फॉर्म सापडलेला असला तरी बी साईसुदर्शनला सातत्य ठेवावे लागेल आणि वृद्धिमन व विजय शंकर यांना धावा कराव्या लागणार आहेत.

गुजरातची गोलंदाजीतील आशा मोहित शर्मा आणि राशीद खान यांच्यावर असणार आहे. मोहित जवळपास सर्व चेंडू हळूवार (स्लो) टाकतो; परंतु गेल्या सामन्यात अशा गोलंदाजीविरुद्ध कशा धावा फटकावायच्या हे पंजाबच्या शशांक सिंगने दाखवून दिले. त्यामुळे उद्याही मोहित शर्मासमोर आव्हान उभे राहू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.