Naveen Ul Haq Trolled: विराटशी पंगा घेणे नवीनला पडले महागात! मुंबईच्या खेळाडूंनी 'ती' कृती करत डिवचलं

Naveen Ul Haq Trolled Sweet Mangoes
Naveen Ul Haq Trolled Sweet MangoesSAKAL
Updated on

Naveen Ul Haq Trolled: आयपीएल 2023च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्याने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. गौतम गंभीरच्या लखनौचा खेळाडू नवीन-उल-हकने शानदार गोलंदाजी केली पण फलंदाजी करताना त्यांचा संपूर्ण संघ फ्लॉप झाला राहिला. यासह या संघाचे विजेतेपदाचे स्वप्नही अपूर्ण राहिले.

आपल्या चमकदार कामगिरीनंतरही विराट कोहलीशी भांडण करणारा नवीन-उल-हक त्याच्या गोड आंब्याच्या टिप्पणीमुळे ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर आंब्याचा फोटो शेअर करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीनला डिवचलं.

Naveen Ul Haq Trolled Sweet Mangoes
Rohit Sharma Hardik Pandya : ही तर सुपरस्टार टीम म्हणणाऱ्या हार्दिकला रोहितने दिले चोख प्रत्युत्तर

लखनौकडून नवीन-उल-हकने सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र त्याने चार षटकांत 38 धावाही दिल्या. नवीनने कर्णधार रोहित शर्माचे ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनचे विकेट्स घेतले. केवळ त्याच्या जीवघेण्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात 200 च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत.

Naveen Ul Haq Trolled Sweet Mangoes
LSG vs MI Eliminator : 5 धावा 5 विकेट्स माधवालने लखनौच्या नवाबी थाटची लावली वाट

लखनौ सुपर जायंट्ससाठी ही सलग दुसरी वेळ आहे जेव्हा हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचूनही ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला आहे. अशा परिस्थितीत नवीन-उल-हकला धडा शिकवण्याचे काम यावेळी मुंबईचे तीन खेळाडू संदीप वारियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय यांनी केले. त्यांनी गांधीजींच्या तीन माकडांच्या स्टाईलमध्ये आंब्याच्या चित्रासह पोज दिली. एक प्रकारे तो नवीन उल हकला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()