LSG vs MI IPL 2023 Eliminator: कोणता संघ आज होणार बाहेर? एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्स -लखनौ आमने-सामने

कोण होणार पास... कोण होणार नापास?
LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios
LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios
Updated on

LSG vs MI IPL 2023 Eliminator : मुंबई इंडियन्स - लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये आज आयपीएलमधील एलिमिनेटर लढत रंगणार आहे. या लढतीत जो संघ पराभूत होईल, तो संघ थेट बाहेर जाईल. या लढतीत विजयी होणारा संघ पहिल्या क्वालिफायर-१ लढतीत पराभूत झालेल्या संघाशी दोन हात करील. क्वालिफायर दुसरी लढत येत्या शुक्रवारी होईल.

मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे; मात्र मागील दोन वर्षांमध्ये या संघाला जेतेपदापासून दूर राहावे लागले आहे. मुंबईचा संघ 2021 मध्ये पाचव्या स्थानावर राहिला; पण मागील वर्षी मुंबईची अखेरच्या स्थानावर घसरण झाली.

LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios
JioCinema Records: Jio सिनेमाने डिजिटल व्ह्यूअरशिपचे मोडले सर्व रेकॉर्ड! इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना

यंदाच्या मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या या संघाला चढ-उतारामधून जावे लागले. गुजरातने अखेरच्या लढतीत बंगळूरला हरवल्यामुळे मुंबईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला. आता अंतिम चारमध्ये पोहोचल्यानंतर मुंबईचा संघ मागे वळून बघणार नाही. जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील.

मुंबई - लखनौ यांच्यामधील लढत ही मुंबईची फलंदाजी व लखनौची गोलंदाजी अशीच असणार आहे. सूर्यकुमार यादव (५११ धावा), इशान किशन (४३९ धावा), कॅमेरुन ग्रीन (३८१ धावा), रोहित शर्मा (३१३ धावा), तिलक वर्मा (२७४ धावा) व टीम डेव्हिड (२१६ धावा) यांच्या खांद्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून असणार आहे. मुंबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी फॉर्ममध्ये आले आहेत. त्यामुळे लखनौच्या गोलंदाजांना त्यांना रोखण्याचे काम करावे लागणार आहे. रवी बिश्‍नोई (१६ विकेट), अमित मिश्रा (७ विकेट), कृष्णाप्पा गौतम (३ विकेट), कृणाल पंड्या (९ विकेट) या फिरकी गोलंदाजांसह आवेश खान, यश ठाकूर व नवीन उल हक या वेगवान गोलंदाजांना ठसा उमटवावा लागणार आहे.

LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios
GT vs CSK MS Dhoni : सामना जिंकला पण धोनीच्या हातून मोठी चूक? कारवाई होण्याची शक्यता

मुंबईची गोलंदाजी कमकुवत

मुंबईचा फलंदाजी विभाग जितका मजबूत आहे, तितकाच कमकुवत त्यांचा गोलंदाजी विभाग आहे. पियूष चावला (२० विकेट) व जेसन बेहरनडॉर्फ (१४ विकेट) या दोन गोलंदाजांखेरीज मुंबईच्या गोलंदाजांना सातत्याने चमकदार कामगिरी करता आलेली नाही. कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन यांना गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. आकाश मधवाल याने प्रभावी कामगिरी केली आहे; पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

कलाटणी देणारे खेळाडू

मुंबई व लखनौ या दोन्ही संघांमध्ये सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू आहेत. मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादव, कॅमेरुन ग्रीन, टीम डेव्हिड यांच्यामध्ये काही क्षणात सामन्याचा नूर बदलण्याची क्षमता आहे. लखनौच्या संघातही सामना त्यांच्या बाजूने झुकवणारे खेळाडू आहेत. मार्कस स्टॉयनिस, निकोलस पुरन, काईल मेयर्स, क्विंटॉन डी कॉक या खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची कुवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.