LSG vs MI Score IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत कठीण झाली आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 172 धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला.
131 च्या एकूण धावसंख्येवर मुंबई इंडियन्सने 17 व्या षटकात चौथी विकेट गमावली आहे. नेहल वढेरा 20 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा करून बाद झाला. आता विष्णू विनोद इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला आहे.
103 धावांवर मुंबई संघाची दुसरी विकेट पडली आहे. ईशान किशन 39 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. रवी बिश्नोईने त्याला नवीन-उल-हककरवी झेलबाद केले. सलग दोन षटकांत मुंबईचे दोन फलंदाज बाद करून बिष्णोईने लखनौला सामन्यात परतवून लावले.
13 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या 2 बाद 107 आहे.
6 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एकही विकेट न पडता 58 धावा आहे. रोहित शर्मा 14 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 26 तर ईशान किशन 22 चेंडूत 29 धावांवर खेळत आहे. ईशानच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना तीन विकेट्सच्या मोबदल्यात 177 धावा केल्या. लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने 89 धावांची नाबाद खेळी खेळली. कृणाल पांड्याने 49 आणि क्विंटन डिकॉकने 16 धावा केल्या.
मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले. त्याचवेळी पियुष चावलाने एक विकेट घेतली.
18व्या षटकात मार्कस स्टॉइनिसने षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टॉइनिसने अवघ्या 36 चेंडूत एक चौकार आणि 4 षटकारांसह पचासाला फटकावले. 18 षटकांनंतर लखनऊची धावसंख्या 3 बाद 147 अशी आहे. 18व्या षटकात स्टॉइनिसने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. अशाप्रकारे 18व्या षटकात एकूण 24 धावा झाल्या.
क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉइनिस यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाज समंजसपणे फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जात आहेत. क्रुणाल हळूहळू आपल्या अर्धशतकाच्या जवळ जात आहे.
लखनऊ संघाने मुंबईविरुद्ध 11 षटक संपल्यानंतर 3 गडी गमावून 78 धावा केल्या आहेत. 11व्या षटकात एकूण 10 धावा झाल्या. क्रुणाल पांड्या 36 आणि मार्कस स्टोइनिस 19 धावा करत खेळत आहे.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने दोन गडी गमावून 35 धावा केल्या. दीपक हुडा छोट्या धावांवर बाद झाला. त्याचवेळी प्रेरक मंकड पहिल्या चेंडूवरच बाद झाला. यानंतर क्विंटन डिकॉकसह क्रुणाल पांड्याने डाव सांभाळला.
लखनऊला एका षटकात दोन धक्के बसले आहेत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेसनने दीपक हुडा आणि दुसऱ्या चेंडूवर प्रेरक मंकडला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतवले.
जेसन बेहरेनडॉर्फ पहिले षटक टाकले आहे. या षटकात फक्त तीन धावा आल्या. आज दीपक हुडा आणि क्विंटन डिकॉक लखनऊसाठी ओपनिंगला आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.